पाकिस्तानात उष्णतेची लाट, १३६ जणांचा मृत्यू

पाकिस्तानात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला आहे, यात १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये शनिवार  हा दिवस सर्वांत उष्णतेचा ठरला. 

Updated: Jun 22, 2015, 09:33 PM IST
पाकिस्तानात उष्णतेची लाट, १३६ जणांचा मृत्यू title=

इस्लामाबाद : पाकिस्तानात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला आहे, यात १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये शनिवार  हा दिवस सर्वांत उष्णतेचा ठरला. 

कराचीमध्ये शनिवारी ४५ डिग्री सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद झाली. सिंध प्रांतातील जाकोबाबाद, लरकना आणि सुक्कुर जिल्ह्यांमध्ये ४८ डिग्री सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, कराचीमध्ये सन ९ मे १९३८ नंतर प्रथमच तापमान एवढे खाली आले होते. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक, मुले आणि महिलांचा समावेश आहे. शिवाय, अनेकांवर उपचार सुरू आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.