राज ठाकरे सपत्नीक मातोश्रीवर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेबांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल झालेत. राज ठाकरेंबरोबर त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित आहेत. महिनाभरात राज ठाकरे तिस-यांदा बाळासाहेबांच्या भेटीला गेलेत.
Nov 1, 2012, 02:24 PM ISTराज ठाकरेंनी घेतली बाळासाहेबांची भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीकडे येथे आज सुमारे दीड तास भेट घेतली.
Oct 26, 2012, 12:23 PM ISTवाघाची डरकाळी ५० डेसिबल्सपेक्षा जास्तच
शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन झालंय. कोर्टानं ५० डेसिबलची मर्यादा घालून दिली असताना प्रत्यक्षात ६५ डेसिबल ते १०५ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद झाली आहे. त्यामुळं मेळाव्याचे आयोजक सदा सरवणकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
Oct 25, 2012, 05:45 PM ISTबाळासाहेब गहिवरले... डोळ्यांत आलं पाणी...
मुंबई : शिवतिर्थावर सेनेचा ४७ वा दसरा मेळावा | आज पुन्हा शिवतिर्थावर वाघाची डरकाळी... व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाळासाहेबांचा शिवसैनिकांशी संवाद
Oct 24, 2012, 09:23 PM ISTबाळासाहेब ठाकरेंची तोफ आज धडाडणार
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्कवर आज सायंकाळी धडाडणार आहे. यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यातून साकारलेल्या ‘फटकारे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
Oct 24, 2012, 10:58 AM ISTसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली!
शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरच्या यंदाच्या दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारलीय. गेली दोन वर्षं शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं होतं.
Oct 10, 2012, 05:48 PM ISTराज-उद्धव एकत्र आल्यास आनंद होईल- गडकरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आले तर सर्वात जास्त आनंद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना होईल. मलाही या घटनेचा आनंद होईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
Oct 9, 2012, 08:26 PM ISTजयराम यांच्या तोंडाचे शौचालय - बाळासाहेब
देशाला मंदिरांची नाही शौचालयांची गरज आहे, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय ग्रामीण मंत्री जयराम रमेश यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. देशात शौचालयांची कमतरतेला काँग्रेस जबाबदार असल्याचेही बाळासाहेबांनी म्हटले आहे.
Oct 8, 2012, 05:29 PM ISTठाकरे कुटुंब उत्तर भारतीयच - निरुपम
नागपूरला उत्तर भारतीय मेळाव्यात काँग्रेस खासदार यांनी पुन्हा ठाकरे घराण्यावर टीकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंब उत्तर भारतातूनच आलं आहे, त्यामुळे त्यांनी उत्तर भारतीयांना सल्ला देऊ नये, असं वक्तव्य खासदार संजय निरुपम यांनी केलंय.
Oct 7, 2012, 11:31 PM ISTपंतप्रधानांवर बाळासाहेबांचा ठाकरी आसूड
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा आगपाखड केलीय. पैसे झाडाला लागत नाहीत पण घोटाळे आणि भ्रष्टाचाराची झाडे काँग्रेस राजवटीत सर्वत्र उगवली आहेत त्याचे काय ? असा सवाल बाळासाहेबांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून केलाय.
Sep 24, 2012, 11:57 AM ISTबिहारी नेत्यांवर बाळासाहेब कडाडले
बिहारी नेत्यांच्या विरोधात ठाकरे कुटुंबीय एकवटले आहेत. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केलंय. तसंच बिहारी नेत्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. दिग्विजय सिंग हे काँग्रेसमधील तमाशातील बिनपैशाचे नाचे असल्याची खरमरीत टीका केलीय.
Sep 3, 2012, 11:52 AM ISTसुषमा स्वराज यांनी घेतली ठाकरेंची भेट
लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या आणि भारतीय जनता पक्षा नेत्या सुषमा स्वराज यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Sep 2, 2012, 10:05 PM ISTयुपीएचं सरकार अनौरसच!- बाळासाहेब
युपीए-२ सरकार अनौरसआहे, हे विधान केल्याबद्दल लालकृष्ण अडवाणींवर काँग्रेसने टीकेची झोड उठवली. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अडवणींच्या विधानावर आपल्या ठाकरी शैलीत पाठिंबाच दिला आहे. अडवाणींच्या तोंडून चुकीने का होईना सत्य बाहेर पडलं, असं बाळासाहेबांनी ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.
Aug 11, 2012, 05:38 PM ISTटीम अण्णाचं 'भूत उतरलं'- बाळासाहेब
आजच्या ‘सामना’मधून बाळासाहेबांनी टीम अण्णांचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. ‘भूत उतरले’ अशा नावाचाच अग्रलेख लिहून त्यात टीम अण्णांची बरखास्ती म्हणजे जनतेच्या मानगुटीवर बसलेलं भूतच उतरलं असल्याची भावना सामनामध्ये व्यक्त केली आहे.
Aug 9, 2012, 05:06 AM ISTठणठणीत बाळासाहेब मातोश्रीवर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लिलावतीतून डिस्चार्ज मिळालाय. बाळासाहेबांची प्रकृती उत्तम आहे. श्वसनाचा त्रास झाल्यानं २४ जुलैपासून बाळासाहेबांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं.
Aug 1, 2012, 08:24 PM IST