beed

भगवानगडावर पंकजा मुंडेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन

महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर जोरदार शक्तीप्रदर्शऩ केलं. सुमारे पाऊण तास केलेल्या भाषणात आपले चुलतबंधू आणि कट्टर विरोधक धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली. 

Oct 11, 2016, 05:05 PM IST

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर

शहरासह उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक शहरं आणि गावांना पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण सध्या भरभरून वाहत आहेत. या धरणाचे ०६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी कोरडे असलेले हे धरण भरभरून वाहत आहे. भरभरून वाहणारं मांजरा धरण पाहण्यासाठी जवळपास १० वर्षाची वाट पाहावी लागली. हे धरण भरल्यामुळे लातूर शहर, उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न पुढील तीन वर्षासाठी मिटला आहे.

Oct 5, 2016, 08:12 AM IST

बीडमध्ये पावसाची विश्रांती, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

बीडमध्ये रविवारी आलेल्या महापुरानंतर रात्री पावसाने विश्रांती घेतलीय त्यामुळे पुराचा जोर कमी झाला आहे. बिंदुसरा नदीपात्रालगत असणाऱ्या वस्त्या,गावं यामध्ये शिरलेलं पाणी हळू हळू कमी झालं. त्यामुळे महापुराने गडबडून गेलेल्या बीडकरांचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलंय. दरम्यान, या पावसाने पाटोदा,चौसाळा या भागातील पाच ते सहा गावांचा अजूनही संपर्क तुटलेलाच आहे.

Oct 3, 2016, 09:00 AM IST

बीड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अनेक ग्रामीण भागातील नदीनाल्यांच्या पाण्यात वाढ होतेय. शहरातल्या बिंदुसरा नदीला पूर आलाय. जोरदार पाऊस आणि पूरस्थितीमुळं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. 

Oct 2, 2016, 05:11 PM IST

सौताडा धबधबा तब्बल वीस वर्षानंतर धो धो बरसू लागला

जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांचे एकेकाळी आकर्षण असलेला सौताडा इथला धबधबा तब्बल वीस वर्षानंतर धो धो बरसू लागला आहे. 

Sep 27, 2016, 11:51 AM IST

बीडमध्ये सेल्फी काढताना दोघे वाहून गेलेत

बीड जिल्ह्यातल्या बिंदुसरा धरणावर सेल्फी काढताना दोघे वाहून गेले. त्यातील एकाला वाचविण्यात यश आले.

Sep 24, 2016, 10:38 PM IST