cabinet expansion

मोदी ब्रिगेडचं खातेवाटप जाहीर: पर्रिकर संरक्षण मंत्री, तर प्रभूंकडे रेल्वे खातं

मोदी सरकारचं पहिला विस्तार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्र्यांच्या खात्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्राला २५ वर्षांनंतर रेल्वे मंत्रालय मिळालंय. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर देशाचे नवे संरक्षण मंत्री झालेत. 

Nov 10, 2014, 12:07 AM IST

उद्धव ठाकरेंचं 'एकला चलो रे'चा नारा, चेंडू पुन्हा भाजपच्या कोर्टात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय. भाजप जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेणार असेल तर शिवसेना विरोधी बाकावर बसेल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तर शिवसेनेचे विधानसभेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आलीय. 

Nov 9, 2014, 07:52 PM IST

भाजपला हवेत सुरेश प्रभू, शिवसेनेची 'सन्मानजक' नवी खेळी

महाराष्ट्रात सरकारमध्ये सन्मानजक स्थान दिलं तरच शिवसेना केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रमाला उपस्थित राहील, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे. भाजपबरोबर सेनाही अधिक आक्रमक झाली आहे.

Nov 8, 2014, 02:24 PM IST

पुढील महिन्यात मोदींच्या मंत्रीमंडळाचा विस्तार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार हे सांगण्यात येतंय. यानुसार पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकतात. 

Jul 28, 2014, 12:03 PM IST

काँग्रेसचा घोळ संपला, अमित देशमुख- अब्दुल सत्तारांचा शपथविधी

काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळावर अखेर पडदा पडलाय. आज सकाळी साडेनऊ वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल के. शंकर नारायणन या दोन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

Jun 2, 2014, 09:13 AM IST