VIDEO : मुलांनी बनवलेली फुलांची रांगोळी महिलेने पायाने पुसली, सोशल मीडियावर संताप

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ओणमच्या दिवशी मुलांनी बनवलेली फुलांची रांगोळी एका महिलेने चक्क पायाने पुसली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 24, 2024, 12:14 PM IST
VIDEO : मुलांनी बनवलेली फुलांची रांगोळी महिलेने पायाने पुसली, सोशल मीडियावर संताप title=

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओवर भरपूर प्रतिक्रिया आल्या आहेत. या व्हिडीओमध्ये एक महिला फुलांची रांगोळी पायाने पुसताना दिसत आहे. ही रांगोळी काही निरागस मुलांनी आपल्या कॉमन एरियात तयेर केली होती. खूप मेहनत घेऊन तयार केलेली ही रांगोळी महिलेने पायाने विस्कटून टाकली आहे. ही घटना बंगलुरुची आहे. 

फुलांची रांगोळी बघून महिला भडकली 

हा संपूर्ण प्रकार बंगलुरुच्या हाऊसिंग सोसायटीतला आहे. मुलांनी लॉबी एरियामध्ये फुलांची रांगोळी बनवली होती. महत्त्वाचं म्हणजे ही मुलं देखील हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे होते. जेव्हा सिमीने आपल्या फ्लॅटच्या बाहेर रांगोळी बघितली आणि तिचा संताप झाला. एवढंच नव्हे तर ती महिला जोर जोरात ओरडू लागली की, कुणी माझ्या घराबाहेर रांगोळी काढली. हे बोलून त्या महिलेने रांगोळी चक्क पायाने पुसली आणि ती रांगोळी पूर्णपणे बिघडवून टाकली. 

लॉबी एरिया वाटतो खासगी 

हाऊसिंग सोसायटीमधील इतर लोकांनी महिलेला; 'तू का रांगोळी पुसलीस?' असा प्रश्न केला तेव्हा ती रागवू लागली. सिमीचं म्हणणं होतं की, रांगोळी तिच्या फ्लॅटसमोर बनवण्याऐवजी कोणत्या तरी कॉमन एरियामध्ये तयार करायला हवी होती. 

तेव्हा शेजारच्यांनी त्या महिलेला सांगण्याचा खूप प्रयत्न केली की, लॉबी एरिया हा कॉमन एरियाच असतो. ज्याचा वापर सगळेच लोक करु शकतात. ओणम हा भारतातील केरळमधील एक लोकप्रिय सण आहे. या दिवशी फुलांची रांगोळी काढली जाते. 

पायांनी तुडवून रांगोळी केली खराब

ओणमच्या निमित्ताने दक्षिण भारतात अनेक घरांमध्ये रांगोळी किंवा पूलकाम केले जाते. हे प्रेम आणि शांततेचे प्रतीक मानले जाते. जे महिलेने तिच्या पायाखाली तुडवून खराब केले होते. वाद सुरू असताना ती महिला अचानक रांगोळीच्या मधोमध उभी राहिली आणि तिने पायाने तुडवून संपूर्ण रांगोळीचे रूपच बिघडवले. तेथे उभ्या असलेल्या लोकांनी त्यांच्या मोबाईल फोनवर महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो नंतर सोशल मीडियावर पोस्ट केला गेला, जो काही वेळातच व्हायरल झाला.