असंवेदनशील! पुण्यातील CA तरुणीच्या मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया देऊन फसल्या अर्थमंत्री, सोशल मीडियावर संताप

पुण्यात CA तरुणीने कामाच्या ताणामुळे मृत्यू झाला. या प्रकरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर गदारोळ सुरु झाला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 24, 2024, 11:09 AM IST
असंवेदनशील! पुण्यातील CA तरुणीच्या मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया देऊन फसल्या अर्थमंत्री, सोशल मीडियावर संताप title=

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एका कार्यक्रमात पुण्यातील सीए एन्ना सेबेस्टियन पेरियलने केलेल्या मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं आहे. या वक्तव्यामुळे सीतारमण यांच्यावर चहुबाजुंनी सोशल मीडियावर टीका होत आहे. एन्नाचा मृत्यू हा कामाच्या ताणामुळे झाला. यावर निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, कामाच्या ताणावर मात करण्यासाठी आत्मविश्वास आणि अंर्तमनाची शक्ती आवश्यक आहे. तसेच याकरिता ईश्वराची कृपा सर्वात महत्त्वाची आहे. या सगळ्या प्रकरणावर सोशल मीडियासह विरोधी पक्षाकडूनही टीका होत आहे. एवढंच नव्हे तर हे वक्तव्य अतिशय असंवेदशनील असल्याचं सांगण्यात येत आहे. 

काय बोलल्या निर्मला सीतारमण

चेन्नईतील वैद्यकीय महाविद्यालयात एका कार्यक्रमाला संबोधित करताना अर्थमंत्री सीतारामण यांनी एन्ना सेबेस्टियन पेरयिल हिच्या निधनाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, 'आमची मुलं कॉलेज आणि विद्यापीठात अभ्यासासाठी जातात आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. सीएचे चांगले शिक्षण घेतलेल्या कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेला कामाचा ताण सहन होत नव्हता. दोन-तीन दिवसांपूर्वी आम्हाला बातमीद्वारे कळलं की, ती कामाचा ताण सहन करू शकली नाही आणि तिचा मृत्यू झाला.

अंर्तमनाची शक्ती महत्त्वाची 

काय घटनेतून कुटुंबाने काय शिकायला हवं? पालकांनी मुलांना शिक्षणासोबतच कामाता ताण सहन करण्याचं मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. कारण हा ताण सहन करण्यासाठी आत्मविश्वास आणि अंर्तमनाची ताकद अतिशय महत्त्वाची आहे. महत्त्वाचं म्हणजे हे फक्त ईश्वराच्या कृपेनेच शक्य आहे. पुढे त्या म्हणाल्या की,'ईश्वरावर विश्वास ठेवा, आपल्याला ईश्वराच्या कृपेची नितांत गरज आहे. परमेश्वराचा शोध घ्या आणि चांगले नियम शिकणे आवश्यक आहे. तुमचा आत्मविश्वास वाढवा. अंर्तमनाची शक्ती फक्त आत्मविश्वासाने वाढते.'

काय आहे प्रकरण?

पुण्यातील अर्न्स्ट अँड यंग इंडिया कंपनीचे 26 वर्षीय सीए एन्ना सेबॅस्टियन यांच्या निधनावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या वक्तव्यानंतर वाद सुरू झाला आहे. सीतारामन यांनी 22 सप्टेंबरला सांगितले होते की, एक महिला सीए कामाचा दबाव सहन करू शकत नाही. दबाव सहन करण्याची शक्ती देवाकडून येते, म्हणून देवाचा आश्रय घ्या.

शिवसेनेच्या खासदाराची प्रतिक्रिया 

यावर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, सीएच्या अभ्यासादरम्यान एन्नामध्ये दबाव सहन करण्याची ताकद निर्माण झाली होती, परंतु चुकीची कामाची पद्धती आणि दीर्घकाळ काम केल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. तुम्ही पीडितेला अशी वक्तव्य करणे थांबवा आणि थोडेसे संवेदनशील व्हा. तुम्ही प्रयत्न केल्यास देव तुम्हाला मदत करेल.

एन्ना सेबेस्टियनचे 20 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, कामाच्या ओझ्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मृत्यूपूर्वी काही दिवसांपूर्वी त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी पुण्यात आले असता त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली.