भुजबळ राज्य कसं चालवावं हे मला शिकवू नका- राज
'भुजबळांनी मला शिकवू नये कसे राज्य चालवावं', 'राज्य कसं चालवावं हे मला चागलंच माहिती आहे', 'टोलनाका बहुतेक भुजबळांची रोजीरोटी आहे वाटतं'. असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
Jun 15, 2012, 07:06 PM ISTकॅगचा अहवाल झी 24 तासकडे, बड्या माशांवर ठपका
कॅगचा अहवाल झी 24 तासच्या हाती लागलाय. या अहवालात अनेक मंत्र्यांचे बुरखे फाटले आहेत. मंत्र्यांनी जमीनी आणि फ्लॅट्स लाटल्याचं या अहवालातून उघ़ड झालंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला नऊ कोटींची जमीन नऊ लाखांना देण्यात आलीय.
Apr 4, 2012, 11:25 PM ISTकाँग्रेसच्या पवित्र्याने भुजबळांची कोंडी
नाशिक महापालिकेत महापौरपदासाठी रामदास आठवलेंच्या रिपाइं उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्टपणे राष्ट्रवादीला सांगण्यात आल्याचं वृत्त आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे छगन भुजबळांना मोठा हादरा बसला आहे.
Feb 23, 2012, 04:31 PM ISTछगन भुजबळ जाणार दिल्लीच्या राजकारणात
राष्ट्रवादीचे बडे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राच्या राजकारणात जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यासोबतच येत्या मनपा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे, आघाडी बाबतच्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Dec 29, 2011, 11:06 PM IST