chagan bhujbal

भुजबळांनंतर आता अजितदादांची चौकशी

छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ आता अजित पवार यांच्या मागेही चौकशीचा ससेमीर लागण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारने २००७ ते २०१३ या कालावधीत मान्यता देण्यात आलेल्या १८९ जलप्रकल्पांच्या संदर्भात चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Feb 10, 2016, 05:37 PM IST

'पाठीत खंजीर खुपसण्याचा डीपी'वर बोलले भुजबळ

छगन भुजबळ यांनी आपल्या व्हॉटसअॅपवर पाठीत खंजीर खुपसण्याचा डीपी लावला होता. हा डीपी त्यांनी पुतणे समीर भुजबळ यांना अटक झाली होती, तेव्हाच लावल्याने चर्चेला उधाण आलं होतं, यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांच्या पाठिशी पक्ष उभा असल्याचे संकेत दिले होते.

Feb 9, 2016, 08:08 PM IST

संयम राखा, कायदेशीर लढाई लढू : छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ काही क्षणात विमानतळावर दाखल झाल्यानंतर आपल्या समर्थकांना संयम राखण्याचे आवाहन केले. मी कायदेशीर लढाई लढणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Feb 9, 2016, 03:11 PM IST

छगन भुजबळ अटकेपासून आणखी किती दूर?

(दीपक भातुसे, झी २४ तास) महाराष्ट्र सदन आणि कालिना भूखंड घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतर, आता ईडीनेही भुजबळ कुटुंबियांविरोधात फास आवळले आहेत. त्यामुळे भुजबळांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. 

Feb 8, 2016, 06:06 PM IST

समीर भुजबळ यांची ईडी कोठडी आज संपणार

माजी खासदार समीर भूजबळ यांची ईडी कोठडी आज संपतेय. तीन कंपन्यांमध्ये पैशांची अफरातफर आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी समीर भुजबळांना अटक करण्यात आलीय. 

Feb 8, 2016, 08:58 AM IST

भुजबळांच्या संपत्तीचं मोजमाप संपता संपेना, पवार-तटकरेंची खडसेंकडे धाव

 सुनील तटकरे आणि अजित पवारांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर भेट झाल्याने राजकीय वर्तुळात याबद्दल अनेक तर्क-वितर्कांना ऊत आलाय. ही भेट महानंदा संदर्भात घेतल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येतेय. 

Feb 3, 2016, 10:24 PM IST

समीर भुजबळांच्या पाठीत पार्टनर्सनेच खुपसला खंजीर?

जेव्हा समीर भुजबळ यांना अटक झाली तेव्हा..

Feb 2, 2016, 05:27 PM IST

समीर भुजबळ अटकेत, छगनरावांची पहिली प्रतिक्रिया

 राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेवर, राष्ट्रवादीचे नेते आणि समीर भुजबळ यांचे काका छगनराव भुजबळ यांची प्रतिक्रिया आली आहे. "प्रकरण दिसतं तसं सरळ नाही, किरिट सौमय्यांनी उगीच बाऊ केला", अशी पहिली प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. एका कार्यक्रमासाठी छगन भुजबळ सध्या अमेरिकेत असल्याचं सांगण्यात येतंय.दरम्यान समीर भुजबळ यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Feb 2, 2016, 09:07 AM IST

भुजबळांच्या मालमत्तेवर ईडीची पुन्हा छापेमारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासमोरील अडचणी संपण्याची काही चिन्हेच दिसत नाहीयेत. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर ईडीनं पुन्हा छापे घातले आहेत. 

Feb 1, 2016, 04:16 PM IST

चौकशीत भुजबळ सहकार्य करत नसतील, तर कारवाई करा - कोर्ट

चौकशीत भुजबळ सहकार्य करत नसतील, तर कारवाई करा - कोर्ट

Jan 29, 2016, 01:07 PM IST

राज-भुजबळ भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर राजकीय पटलावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीमागे कोणती राजकीय समीकरणे दडली आहेत हे जरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले तरी विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबतची भेट असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.

Dec 6, 2015, 12:23 PM IST

छगन भुजबळांनी घेतली राज ठाकरेंची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा रंगली होती. 

Dec 6, 2015, 11:49 AM IST