congress

नगरपंचायत निवडणूक: सिंधुदुर्गात राणे-केसरकरांची प्रतिष्ठा पणाला

सिंधुदुर्गमध्ये वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीसाठी आज मतदान होतंय. नारायण राणे दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागलीय.

Nov 1, 2015, 11:57 AM IST

बिहारमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात

बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.

Nov 1, 2015, 08:47 AM IST

'त्या' पोस्टरमुळे शिवसेनेची अडचण वाढली, काँग्रेसची तक्रार

शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईत काही ठिकांणी लावलेल्या वादग्रस्त पोस्टरमुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. या पोस्टरवर काँग्रेसने आक्षेप घेतलाय.

Oct 22, 2015, 01:56 PM IST

शिवसेनेच्या रडारावर भाजपसह मनसे आणि काँग्रेस...केली पोस्टरबाजी

महानगरपालिका निवडणुकीच्यानिमित्ताने राजकीय रंग अधिक भरु लागले आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय पोस्टरबाजी दिसत आहे. हे पोस्टर भाजपविरोधी दिसत आहे. मात्र, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसनेते नारायण राणे यांचेही फोटोही दिसत आहेत.

Oct 21, 2015, 10:32 AM IST

महागाईच्या विरोधातील सर्वपक्षीय खदखद रस्त्यावर

वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेनेही आंदोलन केल. रिलायन्स मॉलच्या बाहेर तूरडाळ विकून शिवसेनेनं आपला निषेध व्यक्त केला. 

Oct 20, 2015, 04:07 PM IST

काँग्रेसमध्ये तिकीटासाठी बनवावे लैंगिक संबंध-आरोप

माजी काँग्रेस नेता चेरियन फिलिप यांनी रविवारी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले, महिलांना काँग्रेसमध्ये तिकिट मिळवण्यासाठी लैंगिक संबंध ठेवावे लागतात, असा गंभीर आरोप फिलिप यांनी केला आहे.

Oct 19, 2015, 09:54 AM IST

शिवसेनेला किंमत नाही, ते सत्तेसाठी लाचार : नारायण राणे

शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे. त्यांना  भाजप सरकारमध्ये काडीची किंमत नाही. ते कशाला सांगतात, सत्तेतून बाहेर पडायला. त्यांनीच बाहेर पडले पाहिजे. ते मागाहून सत्तेत आले आहे. भाजपनेच यांना काढून टाकले पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपलाच दिलाय.

Oct 15, 2015, 04:04 PM IST

शिवसेनेचा शाई हल्ला काळा इतिहास : काँग्रेस

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध करताना मुंबई भाजपचे माजी सदस्य आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन अध्यक्षचे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई हल्ला केला. हा हल्ला इतिहासातील काळ्या अक्षराने लिहिली जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका करताना दिली.

Oct 13, 2015, 01:46 PM IST