मुंबई : वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेनेही आंदोलन केल. रिलायन्स मॉलच्या बाहेर तूरडाळ विकून शिवसेनेनं आपला निषेध व्यक्त केला.
सध्या डाळीचा भाव २०० रुपयांवर गेलेला असताना सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना ५० रुपये दराने डाळ उपलब्ध करुन दिली. महागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे शिवसेनेने या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या अपयशाकडे लक्ष वेधलं.
बोरीवली विधानसभा मनसे पक्षातर्फे "महागाई विरोधात " आज आंदोलन केले. मुलजीनगर, एस.व्ही.रोड येथील सिंग्नल ते बोरीवली रेल्वे स्थानकापर्यंत महागाई निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महागाईच्या विरोधात महगाईची अत्यंयात्रा काढण्यात आली. तर मनसेचे नगरसेवक आणि त्यांच्या पदाधिका-यांनी मुंडनही केले.
वाढत्या महागाई विरोधात मुंबईत सरकारविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. काँग्रेस आणि मनसे या विरोधीपक्षांच्या आंदोलनाला सत्ताधारी शिवसेनेचीही साथ मिळाली. काँग्रेसने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मुम्बई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेनंही आज सरकारला महागाईवरून घरचा आहेर दिला. सध्या डाळीचा भाव २०० रुपयांवर गेलेला असताना सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना ५० रुपये दराने डाळ उपलब्ध करुन दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.