काँग्रेसचा आक्रमकपणा अंगलट, ५ आमदार दोन वर्षासाठी निलंबित
भाजपने धूर्तपणे आणि चलाखीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस आमदार अधिक आक्रमक झालेत. राज्यपाल विद्यासागर राव विधानसभेत येत असताना धक्काबुकी झाली. यामध्ये काँग्रेस आमदारांनी अधिक आक्रमकपणा दाखविला. हा आक्रमकपणा अंगलट आला. काँग्रेसचे ५ आमदार दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.
Nov 12, 2014, 07:08 PM ISTभाजपने काँग्रेसचा आरोप फेटाळला
भाजपने राज्यपालांच्या निर्देशांची पायमल्ली केल्याचा काँग्रेसचा आरोप भाजपने फेटाळून लावलाय.
Nov 12, 2014, 06:49 PM ISTराज्यपालांना धक्काबुक्की, काँग्रेसच्या १२ आमदारांवर ठपका
विधान भवनाच्या आवारात राज्यपाल विद्यासागर राव यांना विरोधी आमदारांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमध्ये राज्यपालांच्या हाताला जखम झाल्याचं समजतंय. त्या १२ आमदारांना निलंबित करा, असा प्रस्ताव महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मांडलाय.
Nov 12, 2014, 06:34 PM ISTभाजपकडून घटनेचा खून, राज्यपालांकडे दाद मागणार - शिवसेना
भाजप सरकारनं चलाखी करून आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध केल्यानं शिवसेनेनं तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय. भाजपनं घटनेचा खून पाडला असून, हिंमत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं, अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलीय.
Nov 12, 2014, 04:13 PM ISTहिम्मत असेल तर विश्वासदर्शक ठराव आणा - काँग्रेस
भाजपमध्ये हिम्मत असेल तर विश्वासदर्शक ठराव आणा, असे सांगून भाजपनं लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
Nov 12, 2014, 04:03 PM ISTबहूमत तांत्रिकदृष्ट्या सिद्ध, पण लोकशाहीला तिलांजली - घटनातज्ज्ञ
भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं आज आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव पास केला आणि सरकार आणखी सहा महिन्यांसाठी तरलंय. पण मतदान न घेता आवाजी मतदानानं विश्वासदर्शक मंजूर करणं हे घटनाबाह्य असल्याची टीका होतेय, यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सविस्तर माहिती दिलीय.
Nov 12, 2014, 03:48 PM ISTफडणवीस बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी - काँग्रेस
फडणवीस बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी - काँग्रेस
Nov 12, 2014, 02:57 PM IST'फडणवीस विश्वासदर्शक ठराव सिद्ध करू शकले नाहीत' - काँग्रेस
आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव पास करणे, ही लोकशाहीची हत्या आहे, देवेंद्र फडणवीस हे विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले नाहीत, सिद्ध करू शकले नाहीत, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.
Nov 12, 2014, 01:32 PM ISTकसं गाठणार भाजप बहूमत? राष्ट्रवादीची भूमिका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 05:08 PM ISTकाँग्रेस गटनेतेपदी राधाकृष्ण विखे-पाटील, उपनेता वडेट्टीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2014, 06:56 PM ISTकाँग्रेस गटनेतेपदी राधाकृष्ण विखे-पाटील
काँग्रेस गटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर उपनेतेपदी विजय वेडेट्टीवार हे असतील. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत एकूण ४२ जागा आहेत.
Nov 10, 2014, 11:15 AM ISTविरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस दावा करणार- माणिकराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2014, 09:47 PM IST'काँग्रेसने प्रतिष्ठेचा प्रश्न न करता, भाजपला पाठिंबा द्यावा'
काँग्रेस आज खिळखिळी झाली आहे, काँग्रेसने प्रतिष्ठेचा प्रश्न न करता, भाजपला पाठिंबा द्यावा, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटलांनी म्हटलंय. काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याकडून आलेलं हे पहिलं धक्कादायक वक्तव्य आहे.
Nov 6, 2014, 08:53 PM ISTएमआयएम-काँग्रेसचा वाद टोकाला ,MIMवर बंदी घाला - प्रणिती शिंदे
मी कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही. मी देशाच्या बाबतीत म्हणत आहे. देशद्रोहीना आपल्या देशात जागा असता कामा नये. त्यांनी (एमआयएम) कोणत्याही समाजाविषयी भूमिका घेतलेली नाही. त्यानी देशाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत, असा बोल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बंदीची मागणी केली.
Nov 6, 2014, 03:25 PM IST