congress

'राहुल गांधी बँकॉकमध्ये नाही उत्तराखंडात', काँग्रेस नेत्याचा दावा

संसदेचं बजेट सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अचानक सुट्टीवर जाण्याच्या प्रश्नानं अनेक चर्चांना उधाण आलं. इतर पक्ष नाही तर काँग्रेस पक्षामध्येही चर्चा सुरू झाल्या. मात्र आता काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी उत्तराखंडमध्ये असल्याचा दावा केलाय.  

Feb 25, 2015, 12:17 PM IST

भूमी अधिग्रहण विधेयकाला काँग्रेस, तृणमूलचा तीव्र विरोध

भूमी अधिग्रहण विधेयकाला काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेने तीव्र विरोध केला. खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आने वाले नही है, असे म्हणत विधेयकाला विरोध केला. विधेयकाला विरोध करताना विरोधकांनी सभात्याग केला.

Feb 24, 2015, 12:34 PM IST

काँग्रेसला अकबर रोडवरील कार्यालय खाली करण्याचे आदेश

काँग्रेसला अकबर रोडवरील कार्यालय खाली करण्याचे आदेश शहरी विकास मंत्रालयाने दिले आहेत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरी विकास मंत्रालयाने हे आदेश दिले आहेत. काँग्रेस कार्यालयाचा भाडे करार संपुष्टात आल्यानंतर काँग्रेसला ही नोटीस देण्यात आली आहे.

Feb 19, 2015, 07:25 PM IST

जम्मू-काश्मीर: भाजप-पीडीपी सरकार बनवणार

जम्मू-काश्मीरमध्ये सत्तास्थापनेबाबतचा सस्पेंस संपलाय. भाजप आणि पीडीपी मिळून राज्य सरकार स्थापन करणार आहे. २३ फेब्रुवारीपूर्वी सरकार स्थापन केलं जाईल, अशी माहिती मिळतेय. 

Feb 12, 2015, 08:26 PM IST

पंकजा मुंडे यांच्यावरून पुणे महापालिकेत वाद

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरून पुणे महापालिकेत वाद सुरु झालाय. त्यासाठी कारण ठरलीय मुंडे यापूर्वी संचालिका असलेली सुप्रा पब्लिसिटी' हि कंपनी. सुप्रा पब्लिसिटीला बेकायदा मुदतवाढ दिली गेलीय.

Feb 11, 2015, 08:15 PM IST

आमदार प्रणिती शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. २०१३ साली फेसबूकच्या पोस्ट वरून झाली होती मारहाण. 

Feb 10, 2015, 09:06 PM IST

काँग्रेसचा 'हात' सोडत 'झाडू' घेऊन अलका लांबा आमदार

काँग्रेसमध्ये 20 वर्षे राहूनही तिकिट मिळाले नसल्याने नाराज झालेल्या अलका लांबा यांनी काँग्रेचा 'हात' सोडून हाती 'झाडू' घेत आमदारकी मिळविली. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

Feb 10, 2015, 03:20 PM IST

मोदी, बेदींकडून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन

आम आदमी पार्टीमुळे दिल्ली भाजप, काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळालेय. 'आप'ला 65 जागांवर आघाडी घेतल्याने सत्ता आणि विरोधक याच पक्षाचे असणार आहे. या मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पराभूत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी अभिनंदन केलेय.

Feb 10, 2015, 12:24 PM IST

बुडत्या जहाजात जाणार कोण?- दानवेंचं प्रत्युत्तर

काँग्रेस बुडते जहाज असल्यानं आपण तिथं जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असं सांगतानाच भाजपाचे आमदार फोडून दाखवा अन्यथा मी काँग्रेसचे आमदार फोडून दाखवतो, असं प्रतिआव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये बोलताना ठाकरे यांना दिलं. 

Feb 8, 2015, 05:38 PM IST

एक्झिट पोलचा 'आप'ला कौल, भाजप दुसऱ्या स्थानावर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलने 'आम आदमी पक्षा'ला कौल दिला आहे. काहींनी 'आप'ला स्पष्ट बहुमत दिले आहे. तर काहींनी बहुमताचा आकडा पार करेल, असे म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा संपल्यात जमा आहे. अरविंद केजरीवाल यांना ५३ टक्के मुख्यमंत्री पदासाठी कौल मिळत आहे.

Feb 7, 2015, 09:12 PM IST