dalai lama

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर बौद्ध महोत्सव आणि दलाई लामा

धर्मगुरु दलाई लामा यांच्या दौऱ्यादरम्यान बिहारच्या बोधगयामधील महाबोधी मंदिराजवळ स्फोटकं सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.

Jan 20, 2018, 11:41 AM IST

...तर चीनदेखील भारताचं अनुकरण करेल, म्हणतायेत दलाई लामा

आधुनिक जगाला प्राचीन भारतीय शिकवण आणि दृष्टिकोनाची गरज आहे असं मत दलाई लामांनी व्यक्त केलंय.

Dec 7, 2017, 05:36 PM IST

दलाई लामा म्हणतात : स्वातंत्र्य नको, विकास हवा

चीनने जगासाठी आपली दालनं उघडली आहेत, तिबेटच्या विकासालाही त्यांनी अग्रक्रम दिला पाही़जे, असं दलाई लामा म्हणाले.

Nov 23, 2017, 07:12 PM IST

दलाई लामांना भेटणे हा 'गंभीर अपराध', चीनचा फतवा

दलाई लामा यांना भेटणे किंवा बोलणे हा एक 'गंभीर अपराध' समजला जाईल, असा अप्रत्यक्ष फतवाच चीनने काढला आहे. दलाई लामा हे गेली अनेक तिबेटला चीनपासून वेगळे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच, त्यासाठी तेथील जनतेला ते नेहमी भडकवत असल्याचा आरोप चीन सातत्याने करत आला आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील नेत्यांनी दलाई लामांना भेटू नये, असे चीनने म्हटले आहे.

Oct 21, 2017, 04:23 PM IST

भारत चीन वादावर बोलले दलाई लामा

तिबेटचे अध्यामिक गुरू दलाइ लामा यांनी भारत-चीन वादावर वक्तव्य केले आहे. भारत आणि चीन एक दुसऱ्याला पराभूत नाही करू शकत. दोन्ही देशांना शेजाऱ्यासारखे सोबत राहायला हवे.  हिंदी-चीनी भाई भाई ही भावना पुढे नेणे हा एकमेव रस्ता असल्याचेही त्यांनी प्रकर्षाने सांगितले. 

Aug 14, 2017, 06:48 PM IST

...आणि दलाई लामा यांनी रामदेव बाबांची दाढी खेचली

योगगुरू रामदेव बाबा जेव्हा व्यासपिठावर असतात तेव्हा आपल्या कलाकारीने सर्वांचे लक्ष ते सहज वेधून घेतात. पण यावेळेस असा काही प्रसंग घडला की रामदेव बाबा क्षणभरासाठी विचारात पडले. हा प्रसंग मुंबईत घडला. जेव्हा धर्मगुरू दलाई लामा आणि योगगुरू रामदेव बाबा एकाच व्यासपिठावर होते. त्यावेळी दलाई लामा यांनी रामदेव बाबांना स्वत: कडे बोलावून घेतले आणि ते जवळ आल्यावर त्यांची दाढी खेचली.

Aug 13, 2017, 05:07 PM IST

दलाई लामा अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर, चीनचा तिळपापड

चीन विरोधात भारतानं आपला कधीच वापर करुन घेतला नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनला सुनावलं आहे. सध्या दलाई लामा अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर आहेत. त्यामुळे तिळपापड झालेल्या चीननं बिजिंगमध्ये भारतविरोधी अपप्रचाराची मोहीम उघडली आहे.

Apr 5, 2017, 10:12 PM IST

बराक ओबामांनी घेतली दलाई लामांची भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल बौद्ध धर्माचे गुरु  दलाई लामा यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली. ओबामा आणि दलाई लामा यांच्या भेटीवर चीनने आक्षेप घेतला होता. यामुळे चीन-अमेरिकेचे संबंध बिघडतील, असा इशारा चीनने दिला होता. ओबामांनी याकडे दुर्लक्ष करत दलाई लामांची भेट घेतली.

Jun 16, 2016, 05:27 PM IST

दलाई लामांनी केलं बाबांच्या आदोलनाचं कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्या आंदोलनाचं तिबेटीयन बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी कौतुक केलंय. हिंसा आणि भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय. आसाम आणि त्यानंतर सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचाराचाही दलाई लामा यांनी निषेध केलाय..

Aug 14, 2012, 08:49 AM IST