दलाई लामांनी केलं बाबांच्या आदोलनाचं कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्या आंदोलनाचं तिबेटीयन बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी कौतुक केलंय. हिंसा आणि भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय. आसाम आणि त्यानंतर सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचाराचाही दलाई लामा यांनी निषेध केलाय..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 14, 2012, 08:49 AM IST

www.24taas.com, श्रीनगर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्या आंदोलनाचं तिबेटीयन बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी कौतुक केलंय. हिंसा आणि भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय. आसाम आणि त्यानंतर सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचाराचाही दलाई लामा यांनी निषेध केलाय..
भ्रष्टाचार ही एक प्रकारची हिंसाच आहे. आर्थिक क्षेत्रात इतरांचे हक्क नाकारण्याचाच हा प्रकार असतो. बाबा रामदेव यांचं आंदोलन हे देशाला भ्रष्टाचाराच्या संकटापासून मुक्त करेल. असा विश्वास दलाई लामांनी व्यक्त केलाय.
आसाममधील हिंसाचाराबद्दल दुःख व्यक्त करताना दलाई लामा म्हणाले, “ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. भारतामध्ये सर्व धर्म एकत्र नांदतात. या गोष्टीचा भारताला अभिमान असायला हवा. आणि सर्वधर्मसमभाव तसाच अबाधित राहावा.”