girl house

पुण्यात रोडरोमियोचा मुलीच्या घरावर हल्ला

शाळकरी मुलीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून रोडरोमियोनं मुलीच्या पालकांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवाय तिच्या घरापुढील गाडयांचीही तोडफोड केली आहे. यामुळं परिसरातल्या नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मंगळवारपेठेत राहणा-या आशिष डांगे हा रोडरोमियो गांधी विकासनगरमधल्या मुलीची वारंवार छेड काढायचा. रस्त्यात अडवून तिला धमकवायचा. सततच्या त्रासाला कंटाळून मुलीनं याबाबत पालकांना सांगितलं. तिच्या पालकांनी याबाबत जाब विचारल्याचा आशिष डांगेला राग आला. त्यानंतर त्यांनं मित्रांना बोलावून मुलीच्या घराजवळच्या गाड्यांची तोडफोड केली.

Jun 23, 2016, 07:02 PM IST