gold price

सोने १९० रुपये स्वस्त, चांदीत ३०० रुपयांची तेजी

वैश्विक बाजारात मंदीमुळे स्थानिक दागिने विक्रेत्यांची मागणी कमी झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्यात लगोपाठ दुसऱ्या दिवशी घट दिसून आली. सोन्याची किंमत १९० रुपयांनी घटून २६ हजार ८१० प्रति ग्रॅम झाली आहे. 

Sep 3, 2015, 07:09 PM IST

सोने दरात मोठी घट, गेल्या तीन महिन्यातील निच्चांक

मागणीत झालेली घट आणि जागतिक बाजारपेठेवर असलेली मंदीचे सावट यामुळे सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. दिल्लीत सोने ३३० रुपयांनी खाली आले असून गेल्या तीन महिन्यात सोने दर २६,१७० रुपये प्रती तोळा इतका खाली आलाय.

Jul 8, 2015, 04:42 PM IST

सोन्यानं गाठला तीन महिन्यांमधील निचांक

जागतिक बाजारात असलेली मंदी, दागिने निर्माते आणि रिटेल व्यापाऱ्यांची कमी झालेली मागणी यामुळं या आठवड्यामध्ये दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झालीय. तीन महिन्यातील निच्चांक गाठत सोन्यानं २६,५४० प्रति १० ग्राम इतका भाव मिळवला.

Mar 8, 2015, 05:56 PM IST

सोने दरात आणखी घसरण शक्य, 25 हजाराच्या खाली येणार!

सोने खरेदी करण्याऱ्यांसाठी खुशखबर आहे. गेल्या दहा दिवसात सोन्याच्या किंमतीत 10 टक्क्यांनी घट झाली आहे. सोने दराची ही घसरण सुरुच राहण्याचे संकेत आहेत. गतवर्षी 35 हजारांच्यावर पोहोचलेले सोने आता 26 हजारांच्या घरात आहे. सोने दर 25 हजार रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता आहे.

Jun 4, 2014, 09:17 PM IST

अरे वा सोन्याची किंमत अजून घसरली

सोन्याची किंमत दिवसदिवस घसरत असून कालच्या तुलने सुमारे -०.७६ टक्क्यांनी सोन्यामध्ये घट दिसून आली. घाऊक बाजारात सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी २७,२५० तर २२ कॅरेटसाठी २५४७८ प्रति १० ग्रॅम झाली आहे. काल सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी २७,४६० तर २२ कॅरेटसाठी २५६७५ प्रति १० ग्रॅम असे होते.

May 29, 2014, 04:55 PM IST

सोनं, चांदी आणखी घसरलं

सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण कायम आहे. स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोनं 170 रुपयांनी कमी होत गेल्या 10 महिन्यातील सर्वात कमी म्हणजे 28 हजार 100 रुपये प्रति 10 ग्रामवर आलं.

May 28, 2014, 06:14 PM IST

मंदीनंतर सोने वधारले

सोने दराने पुन्हा 30 हजारी गाठली आहे. सोन्याला पुन्हा तेजी आल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईतील ग्राहकांची मागणीमुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Apr 15, 2014, 10:07 AM IST

दिवाळीत सोनं खरेदीचा बेत? खिसा भरलेला ठेवा...

यंदाच्या दिवाळीत सोन्याची वस्तू किंवा दागिने विकत घेण्याचा प्लान करत असाल, तर तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

Oct 28, 2013, 04:07 PM IST

सोने-चांदीच्या दरात तेजीनंतर घसरण

सलग दोन दिवस तेजीत असलेला सोन्याचा भाव मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात ३४० रूपयांच्या घसरनीसह ३१ हजार ६२५ रूपये प्रति तोळा होता. सोन्याबरोबरच चांदीचा भाव ३४० रूपयांनी कमी होऊन तो प्रति किलो ४९ हजार १० हजार रूपयांवर बंद झाला. तर मुंबईत सोमवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. प्रति तोळा २९,७३७ रूपये होता.

Oct 23, 2013, 11:57 AM IST

पहा काय आहेत दर : सोनं-चांदी (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.

Jun 8, 2013, 10:42 AM IST

पहा सोनं-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. काल सोन्याचे दर घटले होते. सोन्याच्या दरात घट झाली होती.

Jun 5, 2013, 11:07 AM IST

पहा सोनं-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. काल देखील सोन्याच्या दरात वाढ झाली होती. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.

May 31, 2013, 02:29 PM IST

सोनं-चांदी काय आहेत दर आजचे (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. कालही सोन्याचे दर घसरले होते. २६,०००च्या खाली सोन्याचे दर गेले.

May 21, 2013, 02:49 PM IST

सोने-चांदीचे पहा आजचे दर (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा घट झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने खरेदीत मात्र वाढ होणार आहे.

May 14, 2013, 11:57 AM IST

शहरानुसार सोन्याचे आजचे भाव

गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदी करण्यावर ग्राहकांच्या उड्य़ा पडत आहेत.

Apr 18, 2013, 04:13 PM IST