gold price

जुलै महिन्यात सोन्याचे भाव होणार कमी

जर तुम्ही आता सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. या वर्षी देखील सोनं मागील वर्षाच्या तुलनेत २ टक्क्यांनी घसरुन २८,६०० रुपयांवर आलं आहे. या वर्षी देखील सोन्यावर मोठ्या रिटर्नची अपेक्षा नाही आहे. कारण अमेरिकेच्या सेंट्रल बँकेकडून जूनमध्ये व्याजदर वाढवण्याची शंका आहे. तर १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार आहे. तज्ज्ञांच्या मते जुलैपर्यंत सोन्याचे भाव आणखी कमी होऊ शकतात.

May 18, 2017, 03:00 PM IST

तीन दिवसांनंतर सोन्याच्या दरात घसरण, मात्र चांदी तेजीत

गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सोन्याच्या दरातील तेजीला अखेर ब्रेक लागलाय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात आज ३० रुपयांची घसरण होत ते प्रतिग्रॅम २८,६०० रुपयांवर बंद झाले. 

May 16, 2017, 05:48 PM IST

मोदींच्या यशानंतर सोने-चांदीचे भाव घसरले

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल आल्यानंतर भाजपने जल्लोष केला. भाजपने दोन राज्यांमध्ये मोठं यश संपादन केलं पण याचा परिणाम सोन्यांच्या भावावर देखील पाहायला मिळाला. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचे भाव २५० रुपये प्रती तोळाने घसरले. तर चांदीचे  भाव ५०० रुपये प्रती किलोने घसरले.

Mar 16, 2017, 09:52 AM IST

मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ

लग्नसराईचा मोसम असल्याने सोन्या-चांदीची खरेदी वाढू लागलीये. स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने शनिवारी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. 

Mar 4, 2017, 04:22 PM IST

सोनं आणि चांदीचा भाव घसरला

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं आणि चांदीचा भाव घसरला आहे. बुधवारी यामुळे दिल्लीच्या सर्राफा बाजारात सोनं १७५ रुपयांनी घसरलं. एका आठवड्यात सोन्याचा भाव हा सगळ्यात खाली गेला आहे. सोन्याचा भाव २९,५५० प्रति तोळावर येऊन पोहोचलं आहे.

Jan 27, 2017, 01:04 PM IST

सोन्याच्या दरात पुन्हा घ़सरण

गेल्या चार दिवसांपासून तेजीत असलेले सोन्याचे दर अखेर शनिवारी घसरले. राजधानी दिल्लीत शनिवारी सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर प्रतितोळा २९,३५०वर पोहोचले होते.

Jan 15, 2017, 12:04 PM IST

सोने मार्केट पडले थंड

मोदी सरकाराने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय घेतल्यानंतर सोने चांदी व्यापाऱ्यांकडे सोने खरेदीसाठी ग्राहकानी गर्दी केली होती. 

Nov 25, 2016, 04:54 PM IST

सोन्याचे भाव आणखी किती वाढणार?

सोन्याचा भाव काही तासात प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. ३० हजार प्रतितोळा वरून सोने ३४ हजार प्रतितोळावर गेला आहे. मात्र सोन्याचा भाव आणखी ३८ हजारावर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Nov 9, 2016, 09:39 AM IST

सोन्याला महिन्यानंतर झळाली, चांदीही महागली

दिवाळीच्या सणात सोने दरात किरकोळ घसरण झालेली पाहायला मिळाली. मात्र, एक महिन्यानंतर सोने दरात चढ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने प्रति 10 ग्राम 30,950 रुपये झाले आहे.

Nov 3, 2016, 11:00 AM IST

सोने झाले स्वस्त, दिवाळीत होणार आणखी स्वस्त

सणासुदीत नेहमी सोने महाग होते पण यंदा वेगळ चित्र दिसत आहे. सोने सतत स्वस्त होत आहे. सध्या सोन्याचे भाव तीन वर्षे जुन्या स्थितीवर पोहोचले. मंगळवारी सोने ३१ हजार ते ३१५०० दरम्यान होते. २०१३ मध्ये दसऱ्यावेळी हा भाव ३१००० रुपये होता. 

Oct 12, 2016, 04:38 PM IST

सोन्याच्या दरात मोठी वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यांच्या दरांनी आज चार वर्षांचा उच्चांक गाठलाय. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि ब्रेक्झिट याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम झालाय.

Jul 7, 2016, 11:06 AM IST

खुशखबर ! सोन्याचे भाव घसरले

जागतिक मंदी आणि स्थानिक सराफांची कमी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत 300 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 30,250 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

Jun 28, 2016, 10:18 PM IST

सोने-चांदीच्या किंमती घसरल्या

विदेशातील कमी व्यवसाय आणि सराफांच्या मागणीत घट झाल्यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याची किंमत २९,६५० रुपये प्रती १० ग्रॅम झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही १६० रुपयांनी घट झाली आहे. चांदीची किंमत ४१,२०० रुपये प्रती किलो झाली आहे.

Jun 20, 2016, 07:12 PM IST

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

स्थानिक बाजारातील कमी मागणीमुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे सोन्यांच्या किंमतीतील घसरण कायम आहे. 

May 29, 2016, 12:58 PM IST