hunger strike

उपोषण मागे घ्यावं, सर्व पक्षीय बैठकीत ठराव... मनोज जरांगे म्हणतात 'दबावाला बळी पडणार नाही'

मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं असा ठराव मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. जस्टिस शिंदेंच्या नेतृत्वात समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच अंतरवाली सराटीत आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या तीन मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 

Sep 11, 2023, 11:14 PM IST

महाराष्ट्र एसटी कामगार पुन्हा आक्रमक, प्रलंबित मागण्यांसाठी 'या' तारखेपासून बेमुदत उपोषण

आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचं 11 सप्टेंबरपासून मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत मुदत उपोषण सुरू होणार आहे.  या आंदोलनाची शासन- प्रशासनाने दखल न घेतल्यास 13  सप्टेबर पासून राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Sep 9, 2023, 06:22 PM IST

भर पावसात महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा

मराठा आरक्षणासाठी जालन्यात सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. दुसरीकडे जरांगे यांना राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतआहे. 

Sep 8, 2023, 07:25 PM IST

10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते. 

Sep 8, 2023, 05:16 PM IST

GR काढला तरी उपोषणावर ठाम; मनोज जरांगे यांनी सरकारला फोडला घाम

मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना जीआरची प्रत दिली. तसंच सुधारणा असल्यास मुंबईत येऊ चर्चा करण्याची विनंती केली.

Sep 7, 2023, 04:37 PM IST

'आश्वासनातला एक शब्दही इकडे-तिकडे नको' उपोषण सोडण्याबाबत मनोज जरांगे सकाळी निर्णय घेणार

निजामकालीन महसुली नोंदी असलेल्यांना कुणबीचे दाखले देणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण जोपर्यंत जीआर काढत नाहीत तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

Sep 6, 2023, 10:58 PM IST

मोठी बातमी; ST विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा पेटणार; गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा मोठा निर्णय

मंगळवारी  एसटी कामगार आमरण उपोषण करणार आहेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून एसटी कामगार आक्रमक भूमिका घेणार आहेत. प्रामुख्याने 16 मागण्यांसाठी हे कामगार आमरण उपोषण करणार आहेत. नागपूर अधिवेशना बाहेर एसटी कामगार उपोषण करणार असल्याचे एसटी कर्मचारी संघटनांकडून सांगण्यात आले.

Dec 19, 2022, 11:35 PM IST

Pune Auto Rickshaw Protest: पुण्यातील रिक्षा आंदोलनाला गालबोट; हडपसर, कात्रज परिसरात धक्कादायक प्रकार!

Pune News: आंदोलनात जे रिक्षाचालक संपात सामील झाले नाहीत. त्यांच्या रिक्षा आडवून प्रवाशांना खाली उतरवलं जातंय. संपात सहभाग न घेतल्याने काचा फोडण्यात गेल्या.

Nov 28, 2022, 07:08 PM IST

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक, 'या' तारखेपासून आमरण उपोषणाची घोषणा

संभाजीराजे यांनी पाच मागण्या केल्या असून सरकारने त्या मागण्यांकडे लक्ष देण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली आहे

Feb 14, 2022, 12:05 PM IST
RALEGANSIDDHI ANNA HAZARE NOT DOING HUNGER STRIKE 13 FEB 2022 PT37S

VIDEO | अण्णा हजारेंचं उद्या होणारं उपोषण रद्द

RALEGANSIDDHI ANNA HAZARE NOT DOING HUNGER STRIKE 13 FEB 2022

Feb 13, 2022, 07:45 PM IST