lk advani

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी विरोधात हा खटला चालणार असून त्यांच्यावर कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Apr 19, 2017, 11:09 AM IST

बाबरी मशिद प्रकरण : लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी?

बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत का, याबाबतचा फैसला आता उद्यावर ढकलण्यात आला आहे. 

Mar 22, 2017, 12:01 PM IST

भाजपमध्ये भूकंप : अडवाणींसह वरिष्ठ नेत्यांची मोदी-शहांवर टीकास्त्र

बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवावर आता भाजपमध्ये अंतर्गत भूकंप सुरू झाले आहे. यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि शांताकुमार यांनी संयुक्त निवेदन देऊन भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 

Nov 10, 2015, 09:14 PM IST

अडवाणींनी पाककडून दाऊदला मागितल्याने आग्रा शांती चर्चा निष्फळ - कसुरी

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरू यांनी आग्र्यामध्ये झालेली शांती चर्चा निष्फळ ठरण्याला भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना जबाबदार धरले आहे. अडवाणी यांनी दाऊद इब्राहिमला भारताकडे सोपविण्याची मागणी केली होती, त्यामुळे आग्र्यातील शांती बैठक रूळावरून घसरल्याचा खुलासा कसुरी यांनी केला आहे. 

Oct 15, 2015, 01:27 PM IST

सुषमा स्वराज यांच्या भाषणाने अडवाणी भावुक

 भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज लोकसभेत खूप भावुक झाले. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत केलेल्या भाषणानंतर अडवाणी भावुक झाल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. 

Aug 12, 2015, 05:27 PM IST

'मी तर लगेच राजीनामा दिला होता' - अडवाणी

भाजपमधील पितामह लालकृष्ण अडवाणी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्यावर हवालाचा आरोप केला गेला, मात्र मी त्या वेळी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता, नेत्यांनी मूल्ये आणि नैतिकता टिकवून ठेवली पाहिजे, असा अप्रत्यक्षरीत्या अडवाणी यांनी मोदींवर वार केला आहे. 

Jun 28, 2015, 11:15 PM IST

लालकृष्ण अडवानींचा संदेश मोदींसाठी नाही - संघ

लालकृष्ण अडवाणी हे आणीबाणी विषयी जे बोलले तो संदेश मोदींसाठी नाही, असं स्पष्टीकरण संघाने दिलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.गो.वैद्य यांनी अडवाणींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटलं आहे.

Jun 18, 2015, 06:43 PM IST

'देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही'

देशात पुन्हा आणीबाणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलंय, यावरून अडवाणी यांनी पुन्हा एकदा केंद्रावरील नाराजी स्पष्ट केल्याची चर्चा आहे. 

Jun 18, 2015, 02:01 PM IST

पद्म सन्मान पुरस्कारासाठी अडवाणी, रामदेवबाबा, श्री.श्री. यांची नावे

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, योगगुरू रामदेव, श्री श्री रवीशंकर यांना पद्म सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास शंभर मान्यवरांना पद्म सन्मान पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. प्रजासत्ताक दिनाआधी त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Jan 23, 2015, 10:06 AM IST

बहुमताचा २५ वर्ष जुना रेकॉर्ड तोडणार - मोदी

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे आपलं मतदान केलं. मोदींनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघ गांधीनगरसाठी मतदान केलं. गुजरातच्या सर्व २६ लोकसभा जागांवर आज मतदान आहे आणि मोदी स्वत: बडोद्यावरून निवडणूक लढवतायेत.

Apr 30, 2014, 10:42 AM IST

सुषमा स्वराज - भाजपमधील धगधगतं महिला नेतृत्व

सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व. २००९मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणींच्या जागी त्यांनी लोकसभेचं विरोध पक्षनेते पद सांभाळलं.

Apr 4, 2014, 07:41 PM IST

लालकृष्ण अडवाणी रुसलेत अन्...

भाजपमध्ये नरेंद्र मोदी फिवर असताना दिल्लीत मात्र, अस्वथ आहे. दिल्लीतील लालकृष्ण अडवाणी यांच्या घराचे उंबरठे भाजपचे वरिष्ठ नेते झिजवत असल्याचे दिसून आले आहे. अडवाणी ज्या ठिकाणांहून आतापर्यंत निवडून येत आहेत तेथून निवडणूक लढण्यास त्यांनी चक्क नकार दिलाय. परंतु भाजप त्याच जागेवर अडून बसले आहे. त्यामुळे अडवाणी रुसून बसलेत. त्याचा रुसवा काढण्यासाठी नेत्यांची पळापळ सुरू आहे.

Mar 20, 2014, 02:10 PM IST

लालकृष्ण अडवाणींच्या उमेदवारीबाबत तिढा

भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, गांधीनगरमधून ते निवडणूक लढविण्यास उत्सुक नाहीत. ते भोपाळ ईच्छूक असल्याने याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Mar 19, 2014, 09:30 AM IST

लालकृष्ण अडवाणींना गांधीनगरहून मिळणार उमेदवारी

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे अखेर गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातूनच लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. गुजरात भाजपच्या संसदीय मंडळाने गांधीनगरमधून केवळ अडवाणींच्याच नावाची शिफारस केलीय.

Mar 18, 2014, 04:32 PM IST