mann ki baat

पुढील वर्षापासून छोट्या पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार नाहीत: मोदी

'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट्या नोकरींसाठी इंटरव्यू घेतले जाणार नाही, अशी घोषणा केलीय. केंद्र सरकारच्या ग्रुप बी, सी आणि डीच्या नोकऱ्यांमधील मुलाखती आता घेतल्या जाणार नाहीत.

Oct 25, 2015, 12:51 PM IST

मोदींच्या ‘मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालण्यास निवडणूक आयोगाचा नकार

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवर प्रसारीत होणारा ‘मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

Sep 16, 2015, 02:34 PM IST

भूसंपादन विधेयकासाठी पुन्हा अध्यादेश नाही, नरेंद्र मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. गुजरातमधील हिंसेमुळं देशातील जनता अस्वस्थ असल्याचं मोदी म्हणाले. 

Aug 30, 2015, 12:16 PM IST

'मन की बात': माझं सरकार 'वन रँक वन पेंशन' आणणारच - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'द्वारे देशातील जनतेला मार्गदर्शन केलं. केंद्र सरकार गरीबांच्या विकासासाठी कार्यरत असून गेल्या वर्षभरात सरकारनं तीन महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत, असं मोदींनी सांगितलं. सैन्यातील जवानांसाठी 'वन रँक वन पेंशन' या योजनेची लवकरच अंमलबजावणी करु असं आश्वासनही त्यांनी या प्रसंगी दिलंय. 

May 31, 2015, 12:42 PM IST

रविवारी, विद्यार्थ्यांसोबत मोदींची 'मन की बात'

 पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 'मन की बात'च्या माध्यमातून देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. रविवारी सकाळी अकरा वाजता रेडिओवरुन हा कार्यक्रम प्रसारीत होईल. 

Feb 21, 2015, 11:01 PM IST

आता मोदी-ओबामांची 'मन की बात, साथ साथ'

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 जानेवारीला भारतीय नागरिकांशी रेडियोवरुन संयुक्तपणे संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे 'मन की बात, साथ साथ' या कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे.

Jan 22, 2015, 08:52 PM IST

ड्रग्जचा होतो '3D' परिणाम, 'त्या' पैशांचा दहशतवादासाठी वापर- मोदी

ड्रग्स किंवा अमली पदार्थांचं सेवन करणं हे स्टाईल स्टेटमेंट नाही ते फक्त विनाशाचं कारण ठरतं, त्यामुळं त्याच्या विळख्यातून बाहेर पडा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तरूणांना केलं. आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद सादत अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावलं. 

Dec 14, 2014, 12:41 PM IST

काळा पैसा भारतात परत आणणारच - मोदी

विदेशातील बँकांमध्ये किती काळा पैसा आहे याचा नेमका आकडा आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र हा काळा पैसा भारतातील गरीबांचा असून त्यातील पै न् पै परत आणू असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.  

Nov 2, 2014, 12:31 PM IST