काळा पैसा भारतात परत आणणारच - मोदी

विदेशातील बँकांमध्ये किती काळा पैसा आहे याचा नेमका आकडा आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र हा काळा पैसा भारतातील गरीबांचा असून त्यातील पै न् पै परत आणू असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.  

Updated: Nov 2, 2014, 12:32 PM IST
काळा पैसा भारतात परत आणणारच - मोदी title=

नवी दिल्ली: विदेशातील बँकांमध्ये किती काळा पैसा आहे याचा नेमका आकडा आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र हा काळा पैसा भारतातील गरीबांचा असून त्यातील पै न् पै परत आणू असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.  

विदेशातील बँकांमध्ये दडवलेल्या काळा पैशावरुन केंद्र सरकारव टीकेची झोड उठली असतानाच केंद्र सरकार या दिशेनं योग्य पाऊल उचलत असल्याचं सांगत मोदींनी सरकारची पाठराखणही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ द्वारे रेडिओवरून जनतेशी संवाद साधला. ‘मन की बात’चा हा दुसरा भाग होता.  

पाहा मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - 

11:24AM - देशातील जनतेला व्यसनाधीनतेच्या विळख्यातून सोडवायचे आहे, पुढील महिन्याच्या 'मन की बात'मध्ये मी याविषयावर भाष्य करीन, याविषयीच्या तुमच्या सुचना आम्हाला कळवा - मोदी
11:22AM - परदेशातील बँकांमध्ये किती काळा पैसा आहे हे माहित नाही, पण तो देशातील गरीब जनतेचा पैसा आहे, तो परत आणणारच - मोदी
11:21AM - परदेशातील काळा पैसा परत आणू, देशाच्या प्रधानसेवकावर विश्वास ठेवा - मोदी
11:16AM - सैन्याचे जवान सीमेचे संरक्षण करण्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीतही मदत कार्य करतात, त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत, सैन्यांच्या जवानांना माझा सलाम - मोदी
11:10AM - स्वच्छ भारत अभियानाला चांगला प्रतिसाद मिळतोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11:02AM - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रेडिओवरील भाषणास सुरुवात, मन की बात द्वारे साधणार जनतेशी संवाद. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.