मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट
मान्सून पूर्व पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली. रात्री आठ वाजल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. मुंबई शहरासह उपनगरांत चांगला पाऊस झाला. भांडुप, घाटकोपर, विक्रोळीत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साठलं होतं. रस्त्यावर पाणी साठल्यामुळे वाहतूक मंदावली होती... अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साठलं होतं... पहिल्याच पावसाने मुंबईची त्रेधातिरपीट उडवली. तरी मुंबईकरांमध्ये मात्र तक्रारीचा सूर नव्हता. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या थंडगार वातावरणात आल्हाददायक अनुभव मिळाला. चेंबूर नाका इथे मोठा वृक्ष कोसळल्यामुळे सायनकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. समोर अग्निशमन दल असून सुद्धा अग्निशमन दल पोहचले नाही. मुंबईबाहेर ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. कल्याणमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर डोंबिवली, बदलापूरमध्येही जोरदार पाऊस झाला... विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं...
Jun 4, 2018, 11:35 PM IST