mumbai weather

बदलापुर येथील कोंडेश्वर धबधब्याचे रौद्र रूप; धडकी भरवणारा पाण्याचा प्रवाह, मंदिरही बुडाले

मुसळधार पावसामुळे बदलापुर येथील कोंडेश्वरच्या धबधब्याचे रौद्र रूप धारण केले आहे. 

Jul 19, 2023, 06:41 PM IST

मुंबईत नाल्यात वाहून गेलं 4 महिन्यांचं बाळ; लोकल थांबली असताना हातातून निसटलं

ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान चार महिन्यांचं बाळ वाहून गेले आहे. लोकल खोळंबल्यानं गाडीतून उतरुन चालत असताना काकाच्या हातून सटकलं बाळ. बाळाचा शोध सुरू.  

Jul 19, 2023, 05:13 PM IST

बांद्रा बॅण्डसॅण्डवर सारा अली खानची मनसोक्त भटकंती, फॅनसोबत सेल्फी आणि रिक्षाने प्रवास... चाहते म्हणाले

Sara Ali Khan Bandra Bandstand: सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. आता तिचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावेळी ती ब्रांदा बॅण्डसॅण्डवर भटकंती करायला आली होती. सोबतच तिनं रिक्षानंही प्रवास केला. 

Jul 7, 2023, 06:49 PM IST

Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी

Mumbai Rains : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.असाच पाऊस सुरु राहिल्यास सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल. मुंबईत पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.  

Jul 4, 2023, 11:17 AM IST

मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Jun 30, 2023, 10:20 AM IST

Mumbai Rain Photo : मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील 4 दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Mumbai Witness heavy rain  : मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. अंधेरी, बोरिवली, गोरेगाव, दादर यासह शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आहे. आयएमडीने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे.

Jun 29, 2023, 02:14 PM IST

Mumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, 'हाय टाईड'चा इशारा

Rain in Mumbai : पावसाची अखेर प्रतिक्षा संपली. पुढच्या दोन - तीन दिवसात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. (Monsoon Update) तर 29 जूनपर्यंत मान्सून राज्यात व्यापणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली बोरिवली, दहिसर परिसरात पाऊस पडलाय...तर कांजूर, भांडूप, विक्रोळी परिसरामध्ये सकाळपासून पाऊस बरसतोय. दरम्यान, समुद्रात तीन ते चार मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jun 24, 2023, 10:21 AM IST

मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून मुंबई-पुण्यात पावसाचा जोर वाढणार

Monsoon Updates : मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

Jun 13, 2023, 07:16 AM IST

बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर; मुंबईतील जुहू चौपाटी येथे सहा जण समुद्रात बुडाले

बिपरजॉय चक्रीवादळामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळल्या आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.  पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक बोलावली आहे. 

Jun 12, 2023, 06:51 PM IST

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स, तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट; येथे मुसळधार कोसळणार

Weather Update in India  : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवताना मुसळधार पाऊस कोसळेल असे म्हटलेय.  उष्णतेच्या कहरानंतर आता पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

May 28, 2023, 08:14 AM IST

Maharashtra Weather Forcast : आजचा दिवस उकाड्याचा; मान्सूनच्या प्रतीक्षेचा; हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Weather Forcast : महाराष्ट्राच्या एका भागात अवकाळीनं थैमान घातलेलं असतानाच राज्याच्या उर्वरित भागांना मात्र उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे. 

May 25, 2023, 06:57 AM IST

राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, देशावर पावसाळी वारे घोंगावणार; पाहा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधून अवकाळीनं काढता पाय घेतला असून, याच अवकाळीच्या मागोमाग आता मान्सून केव्हा येणार याची राज्यातील नागरिक आणि बळीराजाला प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

May 24, 2023, 06:55 AM IST

महाराष्ट्रात Monsoon चं आगमन नेमकं कधी? ऊन- पावसाची धरपकड सुरुच

Maharashtra Monsoon News : राज्याच्या बहुतांश भागांना मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतानाच आता नेमका मान्सून येणार कधी हाच प्रश्न बळीराजा आणि नागरिकांना पडू लागला आहे. याच धर्तीवर पाहूया हवामानाचा अंदाज...  

 

May 22, 2023, 06:42 AM IST