अशोक चव्हाणांनी राणेंना दाखवली 'हाता'ची वज्रमूठ !
राज्यातील काँग्रेस संपविण्याचा विडा प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उचलाय. त्यांच्या जिल्ह्यात काँग्रेस नावापुरते उरली आहे, अशी जोरदार टीका ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चव्हाण यांच्यावर केली होती. मात्र, नांदेड महापालिका निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करीत एकहाती काँग्रेसची सत्ता आणून चव्हाण यांनी राणेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलेय.
Oct 13, 2017, 08:47 AM ISTकाँग्रेसने नांदेडचा गड राखला, भाजपची घोर निराशा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची मतमोजणी सुरु झाली आणि काँग्रेसची परीक्षा सुरु झाली. मात्र, सुरुवातीपासून काँग्रेसने आघाडी घेतली. त्यामुळे भाजपची अडचण वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपला अशोक चव्हाण भारी पडल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
Oct 12, 2017, 01:21 PM ISTनांदेड पालिका निवडणूक निकाल : काँग्रेस, भाजप की एमआयएमची सरशी
नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Oct 12, 2017, 09:33 AM ISTनांदेड पालिका निवडणूक : आजच्या निकालाकडे लक्ष
नांदेड महापालिकेच्या २० प्रभागातील ८१ जागांसाठी काल मतदान झाले. आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच कोण बाजी मारतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Oct 12, 2017, 07:56 AM IST