दाभोलकरांना चिमुकल्यांची अनोखी आदरांजली!
दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. असं असलं तरी दाभोलकरांनी अंधश्रद्धेविरोधात सुरु केलेली चळवळ फोफावत चाललीय. यात साताऱ्यातल्या चिमुकल्या मंडळींनीही सिंहाचा वाटा उचललाय.
Oct 20, 2013, 05:34 PM ISTसजग, विवेकी, निर्भय होवू!- विद्यार्थ्यांची मोहीम
पुण्यातल्या विविध कॉलेजचे ४० विद्यार्थी एकत्र येऊन सजग, विवेकी, निर्भय होवू! ही मोहीम एसपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलीय. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली देत अंधश्रद्धेविरुद्ध समाजाला जागरुक करण्यासाठी हे ४० विद्यार्थी पुढं आले आहेत.
Sep 25, 2013, 12:57 PM IST`दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे`
एक महिना उलटला तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं नाही. डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करा, अशी मागणी करत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर आंदोलन सुरु केलंय.
Sep 21, 2013, 07:01 PM ISTनरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नका - मुक्ता
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन एक महिना उलटला तरी तपास लागलेला नाही. याबाबत राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असताना नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नये असं आवाहन त्यांची मुलगी मुक्ता यांनी केली आहे. तर दाभोलकरांच्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मागणी आपण अजून केलेली नाही, असं हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केलंय. तशी मागणी अजून दाभोलकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली नाही.
Sep 20, 2013, 12:04 PM ISTदाभोलकरांच्या हत्येमागे सरकारचाच हात? - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारवर तोफ डागली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रश्नी तपास करण्यास सरकारला अपयश आले आहेत. या हत्याप्रकरणी सरकारबाबत संशय निर्माण होत आहे. त्यांचाच हात नाही ना, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
Sep 19, 2013, 12:32 PM ISTदाभोलकरांच्या हत्येचा तपास NIAकडे?- आज सुनावणी
नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना अपयश आलंय. एक महिना होत आला तरी आरोप मोकाट आहेत. त्यामुळं एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेकडे याप्रकरणाचा तपास द्यावा, अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात दाखल केलीये. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
Sep 19, 2013, 08:46 AM IST‘पवारांच्या राष्ट्रवादी टोळीवरच हवी बंदी’
सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर बंदीची मागणी सनातन संस्थेने केलीय.
Aug 30, 2013, 06:33 PM ISTडॉ. दाभोलकर हत्या सीसीटीव्ही फूटेज पाठवणार लंडनला
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणंचं सीसीटीव्ही फूटेज आता अधिक तपासणीसाठी लंडनला पाठवले जाणार आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शहाजी साळुंखे यांनी ही माहिती दिलीय.
Aug 30, 2013, 08:40 AM ISTदाभोलकरांनी कुणाचं केलं नुकसान? पोलिसांसमोर प्रश्न
निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता एक आठवडा उलटून गेलाय. मात्र, अजुनही या प्रकरणाचा तपास अधांतरीच आहे. आता पोलिसांनी आपला मोर्चा व्यावसायिकांकडे वळवलाय.
Aug 28, 2013, 03:23 PM ISTदाभोलकरांच्या हत्याप्रकरणी धागेदोरे, पोलिसांचा दावा
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची गोळी मारून हत्या करणाऱ्यांच्या मोटरसाईकलचा तपास लागला आहे, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.
Aug 23, 2013, 11:04 AM ISTदाभोलकरांच्या हत्येशी संबंध नाही- सनातन संस्था
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी `सनातन`चा काहीही संबंध नसल्याचा खुलासा संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केलाय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा खुलासा केला. शिवाय सनातन संस्थेनं कालच जाहीर पत्रक काढून डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचा निषेधही व्यक्त केला होता.
Aug 21, 2013, 04:34 PM ISTमृत्यूनंतरही डॉ. दाभोलकरांवर सनातनची आखपाखड
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूनंतरही सनातन प्रभातकडून त्यांची अवहेलना सुरुच आहे. दाभोलकरांचा झालेला मृत्यू ही ईश्वरी कृपाच असल्याची आगपाखड सनातनच्या मुखपत्रातून करण्यात आलीय.
Aug 21, 2013, 02:18 PM ISTमुंबई क्राईम ब्रॅँचकडे तपास, दाभोलकर कुटुंबीयांची तीव्र प्रतिक्रिया
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुंबई क्राईम ब्रॅँचकडून स्वतंत्रपणे तपास करण्यात येणार आहे. त्यासाठी क्राईम ब्रँचची एक टीमही पुण्यात दाखल झालीय. मुंबई क्राईम ब्रँचला दाभोलकरांच्या मारेक-याबद्दल काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेत. त्यानुसार हा तपास करण्यात येणार आहे. तर कुटुंबीयांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Aug 21, 2013, 02:16 PM ISTउष:काल होता होता काळ रात्र...
पुणं हे नेहमीच पुरोगामी चळवळीचं केंद्र राहिलंय. अनिष्ट रुढी आणि परंपरांविरोधात युद्ध पुकारणारे अनेक मोठे सुमाजसुधारक पुण्यानं दिले. या पुण्यभूमीतच समाजसुधारकांना छळालाही सामोरं जावं लागलं. पुरोगामी दाभोलकरांच्या बाबतीत मात्र प्रतिगामी शक्तींनी अमानुषतेचं टोक गाठलं. दाभोलकरांच्या हत्येमुळं उष:काल होता होता काळ रात्र झाल्याचाच अनुभव महाराष्ट्राला आलाय.
Aug 21, 2013, 11:30 AM ISTडॉ. नरेंद्र दाभोलकर नावाचं वादळ
अंधश्रद्धा निर्मूलन आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्रात समानार्थी शब्द बनलेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी त्यांनी हयातभर `साधना` केली. पुरोगामित्वाचा वारसा सांगणा-या महाराष्ट्रात त्यांची हत्या व्हावी, यासारखं दुसरं दुर्दैव ते कोणतं..?
Aug 21, 2013, 11:22 AM IST