new data

एअरटेल केवळ २९ रुपयांत देणार महिन्याचे इंटरनेट

    
    नवी दिल्ली :  पहिल्यांदा किंवा अधून मधून इंटरनेट वापरणाऱ्यांची गरज लक्षात घेऊन एअरटेलने मंगळवारी २९ रुपयात महिन्याचे इंटरनेटसाठी प्रीपेड डेटा पॅक बाजारात आणला आहे. 
    
    ३० दिवसाची वैधता असलेल्या या पॅकमध्ये ७५ एमबी २जी, ३जी किंवा ४ जी डेटा मिळणार आहे. 
    
    ग्राहक आता १ रुपया प्रतिदिन या हिशेबाने महिनाभर ऑनलाइन राहू शकतात.  

Sep 7, 2016, 06:48 PM IST