'पाक' सेना प्रमुखांचा इशारा, हल्ला झाला तरी शत्रुचेच नुकसान
पाकिस्तानी सैन्य कुठल्याही प्रकारचा हल्ला झेलण्यास समर्थ आहे असे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी सोमवारी (९ ऑक्टोबर) सांगितले. तसेच हल्ला झाल्यास शत्रूला "असह्य नुकसान" होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. ते देशाच्या वायव्य भागात रिजलपूरमधील असगर खान अकादमीतील पाकिस्तान वायुसेना कॅडेट्सच्या संबोधित करत होते. पाकिस्तान शांतताप्रिय देश आहे आणि शांततेला प्रोत्साहन देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Oct 10, 2017, 08:42 AM IST