10

दक्षिण आफ्रिकेत रेल्वे - ट्रक अपघातात १८ ठार, २४५ जण जखमी

दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी रेल्वे आणि ट्रक अपघातात १८ जण ठार झालेत तर २४५ लोक जखमी झालेत. ट्रक रेल्वे पटरी पार करताना हा अपघात झाला. यावेळी आग लागली. या आगीत अनेक प्रवासी होरपळेत.

'आप'मधील वाद चव्हाट्यावर, कुमार विश्वास यांना डावलून राज्यसभेचे उमेदवार जाहीर

 अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे जवळचे मित्र कुमार विश्वास यांना धोका दिलाय. तसा आरोप खुद्द विश्वास यांनी केलाय. त्यामुळे 'आप'मध्ये दुफळी पडण्याची शक्यता आहे.  

गुजरातमध्ये आणखी एक मंत्री नाराज, रुपाणी यांच्यासमोर नवी अडचण

गुजरातमध्ये नितीन पटेल यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर भाजपची अडचण वाढली. त्यांना शांत केल्यानंतर आता आणखी एक मंत्री नाराज असल्याने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

पाकिस्तानात डोरेमॉनवर संपूर्ण बंदीची आमदारांची मागणी

लहान मुलांवर अधिराज्य गाजवणाऱ्या टीव्ही कार्टून मालिकेवर गदा येण्याची शक्यता आहे. लहान मुलांवर नकारात्मक प्रभाव पडत असल्याचा आरोप करत पाकिस्तानात डोरेमॉनवर संपूर्ण बंदीची मागणी येथील एका आमदारांनी केली आहे. ही मागणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांची लोकसभेत दिलगिरी

केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आज लोकसभेत आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. 

केंद्र सरकारकडून बचतीतून मिळणाऱ्या व्याजावर कात्री

केंद्र सरकारने पीपीएफ, किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे यांच्यासह अनेक लघुबचत योजनांच्या व्याजदरात 0.2 टक्क्यांची कपात करण्यात आलीय. यामुळे सर्वसामान्य नागरिकाला छोट्या बचतीतून मिळणा-या व्याजावर एकप्रकारे कात्री लागणार आहे. 

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, भारताचे पुन्हा सर्जिकल उत्तर

भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पुन्हा एकदा चोख  प्रत्युत्तर दिलेय. पाकिस्तानी हल्ल्यात शनिवारी शहीद झालेल्या चार जवानांवरील हल्ल्याचा बदला भारतीय सैनिकांनी घेतला आहे. पाकिस्तानचे तीन सैनिक ठार मारण्यात आलेय.

गुजरात मुख्यमंत्री शपथविधी सोहळा लांबला

  गुजरातमध्ये विजय रुपाणी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. 25 डिसेंबरऐवजी आता 26 डिसेंबरला रुपाणी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 

वानखेडे स्टेडिअमवर आज भारत - श्रीलंका तिसरा टी-२० सामना

 भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान तिसरा टी-२० सामना रंगणार आहे. 

भारतीय विमानसेवा क्षेत्र डबघाईला येण्याची भीती, संसदेत प्रश्न उपस्थित

जेट एअरवेजच्या ढिसाळ कारभारामुळे भारतीय विमानसेवा क्षेत्रच डबघाईला येण्याची भीती खासदार अमर सिंह यांनी राज्यसभेत व्यक्त केलीय.