वानखेडे स्टेडिअमवर आज भारत - श्रीलंका तिसरा टी-२० सामना

 भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान तिसरा टी-२० सामना रंगणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 24, 2017, 08:24 AM IST
वानखेडे स्टेडिअमवर आज भारत - श्रीलंका तिसरा टी-२० सामना title=

मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान तिसरा टी-२० सामना रंगणार आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये श्रीलंकेला धूळ चारत क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. हा सामना सायंकाळी ९ वाजता सुरु होईल.

रोहितच्या कामगिरीकडे लक्ष

श्रीलंकन गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करणारा रोहित शर्मा घरच्या मैदानावर कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे भारत दौऱ्याचा शेवट गोड व्हावा आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी श्रीलंका प्रयत्न करण्याची जोरदार शक्यता आहे.

भारतीय संघ :

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, एमएस धोनी (यष्टीरक्षक), हरदीप पंड्या, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, जयदेव उनाडकत, जसप्रित बुमराह, युज्वेंद्र चहल, मोहम्मद सिराज, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, बसिल थंपी

श्रीलंका संघ :

श्रीलंका -  निओशन डिक्ववेला (यष्टीरक्षक), उपुल थरंगा, कुसल परेरा, थिसारा परेरा (कर्णधार), दानुस्का गुनाथिलका, एसाला गुरुरत्ने, सदेरा समरविक्रम, चतुरंगा डिसिल्वा, अकिला दानंजय, दुश्मन्त चमेरा, नुवान प्रदीप, दसुन शानका, विश्व फर्नांडो, सचिथ पठाराना