मिसिसिपी : अमेरिकेतील मिसिसिपीत झालेल्या गोळीबारात ८ जण ठार झालेत. यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
मिसिसिपीमधील लिंकन काउंटी भागात शनिवारी रात्री तीन वेगवेगळ्या घरांमध्ये गोळीबार झाला. गोळीबारामागचे कारण सांगण्यास पोलिसांनी नकार दिलाय.
संशयित गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.