मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना ६७ टक्क्यांची वेतनवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे प्रतिदिन दोन लाख रुपये वेतन झाले आहे.
आयसीआयसीआय बँक या देशातील दुसऱ्या मोठय़ा बँकेच्या प्रमुख आणि मानाच्या फोर्ब्ज यादीतील अव्वल चंदा कोचर यांचे वार्षिक वेतन गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल ६४ टक्क्यांनी वाढले आहे.
त्यांचा दिवसाचा २.१८ लाख पगार झालाय तर मूळ वेतनात १५ टक्के वाढ झाली आहे. तुलनेत बँकेतील मध्यम फळीतील कर्मचाऱ्यांचे वेतन २०१६-१७ मध्ये १२ टक्क्यांनी वाढले आहे.
चंदा कोचर यांना गेल्या आर्थिक वर्षांत एकूण ७.८५ कोटी रुपये मिळाले आहेत. आधीच्या वर्षांत ही रक्कम ४.७९ कोटी रुपये होती. गेल्या आर्थिक वर्षांत कोचर यांना २.६७ कोटी रुपये मूळ वेतन मिळाले आहे. तर कामगिरी लाभांश म्हणून त्यांना २.२० कोटी रुपये मिळाले आहेत.
२०१५-१६ च्या शेवटच्या तिमाहीत बँकेने नफ्यातील ८७ टक्के घसरण नोंदविली होती. कोचर यांचे मूळ वेतन गेल्या आर्थिक वर्षांत १५ टक्क्यांनी वाढले आहे. तुलनेत बँकेतील मध्यम फळीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात १२ टक्के वाढ झाली आहे. हा लाभ मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ८२,८४१ आहे. बँकेच्या कार्यकारी संचालकपदावरील व्यक्तींना गेल्या आर्थिक वर्षांत ७.५६ कोटी रुपयांचे वेतन मिळाले आहे.