10

ढाका हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलीस चकमकीत ठार

ढाका हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलीस चकमकीत ठार झाला आहे. बांग्लादेशची राजधानी ढाका येथील कॅफेत त्याने दहशतवादी हल्ला केला होता. ढाका पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान झालेल्या चकमकीत मास्टरमाईंड नुरूल इस्लाम मरजान हा दहशतवादी आणि त्याचा एक सहकारी ठार झाला.

अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं निलंबन रद्द, सपातील फूट टळली

 अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं निलंबन रद्द झालंय.. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांच्या घरी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.. दोघांनाही सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं.

उत्तर प्रदेशमध्ये आजचा दिवस महत्त्वाचा, आमदारांची मुलायम की अखिलेशला पसंती?

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या राजकारणासाठी आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे. सपासाठी आजचा दिवस सुपर सॅटर्डे ठरणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या शक्तीप्रदर्शनाचा हा दिवस आहे.

कोळसा खाणीत जमीन खचल्याने ९ जणांचा मृत्यू

झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचल्याने 9 जणांचा मृत्यू झाला. तर आणखी 40 ते 50 कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरमधून फेकून देऊ'

भ्रष्टाचारी अधिका-यांना हेलिकॉप्टरमधून फेकून देऊन, अशी धमकी फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी दिलीय. तसंच ड्रगमाफियांनाही ठार करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

जयललिता यांच्या मृत्यूबाबत मद्रास उच्च न्यायालयाची साशंकता

तामिळनाडूनच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आलाय. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

मॅक्सिकोत फटाका मार्केट आगीत 26 जणांचा होरपळून मृत्यू

मॅक्सिकोत एका फटाक्याच्या मार्केटला भीषण आग लागली. या आगीत होरपळून 26 जणांचा मृत्यू झालाय, तर 70 हून अधिक लोक गंभीर जखमी झालेत.  

चंदीगड स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपला चांगले यश, काँग्रेसला धक्का

पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधी झालेल्या चंदीगडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला पराभवाचा मोठा सामना करावा लागला आहे. 

पाकिस्तानमध्ये नोटबंदी, 5000च्या चलनी नोटा रद्द

 पाकिस्तानच्या राज्यसभेत देशातल्या 5000च्या चलनी नोटा रद्द टप्प्या टप्प्यानं करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. 

विजय दिवस : तिन्ही संरक्षण दल प्रमुखांची शहिदांना आदरांजली

विजय दिवसानिमित्त संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि तिन्ही संरक्षण दल प्रमुखांनी अमर जवान ज्योती इथं शहिदांना आदरांजली वाहिली.