10
10
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसीफ यांनी भारताला पुन्हा एकदा अणू हल्ल्याची धमकी दिली आहे.
भारतानं पाकिस्तानला दिलेल्या विशेष मित्र राष्ट्राचा दर्जाचा पुनर्विचार करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील पहिल्या जाहीर चर्चेला सुरुवात झाली. यात हिलरी यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे.
गोव्यात ब्रिटीश मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणातील दोघांची सबळ पुराव्याअभावी पणजीतील बाल न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.
राज्यातील नैसर्गिक श्रोतांवर राज्य सरकारचे अधिकार आहेत. त्यामुळे पाणी सोडण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारचे असून भौगोलिक विभागानुसार पाण्यावर हक्क सांगणे चुकीचे आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाला गरजेनुसार पाणी सोडावे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मिरच्या उरी भागातल्या लच्छीपुरात झालेल्या चकमकीत लष्करानं तब्बल दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यात एक जवान शहीद झाला. तर आणखी चार ते पाच अतिरेकी लपल्याची शक्यता आहे.
राजधानी दिल्लीत अंगावर शहारे आणणारी आणखी एक घटना घडली आहे. दिल्लीतल्या बुराडी परिसरात सकाळी भर रस्त्यावर एका मुलीची हत्या करण्यात आली.
बांग्लादेशची राजधानी ढाका. या राजधानीतील रस्ते रक्तांने माखले आहेत. रक्ताचा पूर रस्त्यांवर दिसून येत आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वेगावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे.