काँग्रेसच्या २ नगरसेवकांमध्ये हाणामारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2015, 09:46 PM ISTठाणे महापालिकेच्या आवारात काँग्रेसच्या २ नगरसेवकांमध्ये हाणामारी
ठाणे महापालिकेच्या काँग्रेस नगरसेवकांमध्ये राडा झालाय. काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि राजन किणेंमध्ये वैयक्तीक कारणांनी सभागृहाबागेर हाणामारी झाली. त्यानंतर या दोघांचे समर्थक एकमेकांना भिडले.
May 15, 2015, 08:36 PM ISTठाण्यात ठाकरे पॅटर्न, नवा महापौर सेनेचाच!
अखेर शिवसेनेने ठाणं राखलं. शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील ठाण्याचे नवे महापौर म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचा पराभव केला. हरिश्चंद्र पाटील यांना ७३ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याने मनसेच्या सात नगरसेवकांनी युतीच्या बाजुने मतदान केलं तर सेना-भाजपकडे ६६ इतकं संख्याबळ आधीपासून होतं.
Mar 7, 2012, 08:28 AM ISTउद्धव यांनी घातलं राजसमोर लोटांगण- आव्हाड
ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीरपणे शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सेना-भाजप युतीचा महापौर होणार आहे हे निश्चित झालं आहे. गेले दोन-तीन दिवस भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे गायब झाल्या होत्या त्यावरुन सेना-भाजपने ठाणे बंद आणि महामोर्चा तसंच न्यायालयीन लढाई आणि हिंसक मार्गांचाही अवलंब केला त्या सुहासिनी लोखंडे अखेर सभागृहात अवतरल्या आहेत.
Mar 6, 2012, 07:26 PM ISTअपहृत नगरसेविका महाबळेश्वरला
ठाण्यातील दोन अपहृत नगरसेविका अखेर महाबळेश्वर येथे सापडल्या असून त्या दुपारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती अपहृत नगरसेविका अनिता किणे यांचे पती राजन किणे यांनी झी २४ ला माहिती दिली.
Mar 6, 2012, 04:54 PM ISTसुहासिनी लोखंडे अखेर ठाणे मनपामध्ये हजर
ठाण्यातील अपहृत नगरसेविका सुहासिसिनी लोखंडे अखेर ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात दाखल झाल्या आहेत. त्या महाबळेश्वरला असल्याची माहिती काहीवेळापूर्वीच 'झी २४ तास'ला देण्यात आली होती.
Mar 6, 2012, 04:12 PM IST