सुहासिनी लोखंडे अखेर ठाणे मनपामध्ये हजर

ठाण्यातील अपहृत नगरसेविका सुहासिसिनी लोखंडे अखेर ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात दाखल झाल्या आहेत. त्या महाबळेश्वरला असल्याची माहिती काहीवेळापूर्वीच 'झी २४ तास'ला देण्यात आली होती.

Updated: Mar 6, 2012, 04:12 PM IST

www.24taas.com, ठाणे

ठाण्यातील अपहृत नगरसेविका सुहासिसिनी लोखंडे अखेर ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात दाखल झाल्या आहेत. त्या  महाबळेश्वरला असल्याची माहिती काहीवेळापूर्वीच 'झी २४ तास'ला देण्यात आली होती.

भाजपच्या सुहासिनी लोखंडे या गेल्या २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्या होत्या. या प्रकरणांविरोधातशिवसेना-भाजप आणि आरपीआय महायुतीनं ठाणे बंद केला होता.  दरम्यानच्या काळात या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादी आणि भाजपने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. भाजपने तर थेट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवरच अपहरणाचा आरोप करून तक्रार दाखल केली.

एवढं सगळं होऊनही सुहासिनी लोखंडेंचा मात्र ठावठिकाणा लागलेला नव्हता. ठाण्यातल्या सत्ता संघर्षातून भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचे अपहरण झाल्याचा वाद हायकोर्टात पोहचला. भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती.