sambhaji bhide controversial statement

संभाजी भिडेंना अटक करा नाहीतर त्यांना ठार करेन; माजी राज्यमंत्र्याची धमकी; उपमुख्यमंत्र्याना दिलेले पत्र व्हायरल

भिडेंविरोधात राज्यभरात संतापाची लाट आहे.  त्यांच्याविरोधात आंदोलन होत आहेत. आता मात्र थेट संभाजी भिडेंनाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

Aug 2, 2023, 10:48 PM IST

सोलापुरात भिडे समर्थकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सुरु होतं आंदोलन

सोलापूरत संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच्या निषेधार्थ भिडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला

Aug 2, 2023, 05:18 PM IST

महात्मा गांधी, महात्मा फुले, शिर्डीचे साईबाबा यांच्यावर टीका करताना भिडेंची पातळी घसरली? नेमकं म्हणाले तरी काय?

राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, शिर्डीचे साईबाबा यांच्यावर टीका करताना भिडेंची जीभ चांगलीच घसरली. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. 

Jul 31, 2023, 09:35 PM IST

'संभाजी भिडेंचा भाजपशी संबंध नाही', देवेंद्र फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

Sambhaji Bhide Controversial Statement: संभाजी भिडेंचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतंत्र संघटना चालवतात असेही फडणवीस म्हणाले. याला जाणिवपूर्वक राजकीय रंग देण्याचा काहीच अर्थ नसल्याचे ते म्हणाले.

Jul 30, 2023, 01:36 PM IST

संभाजी भिडेंच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का ? काँग्रेसचा गंभीर आरोप

महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात काँग्रेसचा राज्यभर आक्रोश. संभाजी भिडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे, तसंच अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Jul 29, 2023, 05:52 PM IST

'कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलतो'; शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य!

मुख्यमंत्र्यांना (CM) भेटायला गेलेल्या संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

Nov 2, 2022, 11:47 PM IST