sindhudurg

आंबोलीत सेल्फीमुळे नाही तर नशेत दोघांचा मृत्यू, व्हीडिओ व्हायरल

 आंबोलीत दोन पर्यटकांच्या दरीत पडून झालेल्या मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आली असून सेल्फी काढण्याच्या नादात नाही, तर दारुच्या नशेत पाय घसरल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचं आता समोर येत आहे. 

Aug 3, 2017, 08:19 AM IST

आंबोलीत १०० फूट खोल दरीत कोसळूनही तो वाचला

 देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय सिंधुदुर्गमधील आंबोलीत आलाय. गोव्यातील तरुण प्रवीण नाईक हा आंबोलीत खोल दरीत कोसळला. मात्र दैव बलवत्तर म्हणून प्रवीण दरीत कोसळूनही वाचलाय. 

Jul 30, 2017, 01:22 PM IST

कोकणातील ग्रामपंचायत, शाळा वायफाय सेवेने जोडणार

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परीषदेच्या शाळा वायफाय सेवेने जोडण्यात येणार असल्याची माहिती  केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिली. ते अलिबाग येथे आयोजीत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. 

Jul 28, 2017, 07:38 PM IST

कोकणात जोरदार पाऊस, नद्या दुथडी

कोकणात तिन्ही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे, नद्या दुथडी वाहत आहेत.

Jul 18, 2017, 04:35 PM IST

काँग्रेस आमदार नितेश राणेंना अटक

अवैध पर्ससीन विरोधी आंदोलन करताना काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना आज मालवण पोलिसांनी अटक केली.

Jul 11, 2017, 12:31 PM IST

आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यावर मासा फेकून मारला

मालवणमध्ये मच्छिमारांच्या आंदोलनात आमदार नितेश राणेंनी अधिकाऱ्यांवरच अरेरावी केल्याचा प्रकार उघड झालाय. यावेळी बाचाबाचीनंतर अधिकाऱ्यावर मासा फेकून मारला. त्यामुळे येथे गोंधळ निर्माण झाला.

Jul 6, 2017, 02:40 PM IST

सागरी महामार्गावरचा दांडे पूल खचला, लाखो रुपयांचा चुराडा

रत्नगिरी-सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणारा सागरी महामार्गावरचा दांडे पूल खचल्यामुळे आता इथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतलाय.

Jun 29, 2017, 11:49 PM IST

उद्धव ठाकरे राणेंबद्दल असे म्हणालेत व्यासपीठावर!

येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमीपूजनाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. यावेळी राणे यांनी उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर उद्धव यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत राणेंचा भाषणात उल्लेख केला. 

Jun 23, 2017, 07:18 PM IST

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात दोन खुर्च्यांचे अंतर

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांच्यामध्ये केवळ दोन खुर्च्यांचेच अंतर आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jun 23, 2017, 04:18 PM IST