teacher

विद्यार्थ्यांना वाचविता कुत्र्याचा भर वर्गात शिक्षिकेवर हल्ला

 पिसाळलेल्या कुत्र्यानं भर वर्गात शिरुन शिक्षिकेवर जीवघेणा हल्ल्या केल्याची घटना नालासोपाराच्या श्रीमती इरावती देवी हिंदी हायस्कुल घडलीय. या घट्नेने विद्यार्थी आणि शिक्षिकेत घबराहट पसरली आहे. 

Jul 19, 2014, 08:06 AM IST

शिक्षिकेने छत्री मारली, विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत

सावरकरनगरमधील ज्ञानोदय विद्यालयातल्या एका विद्यार्थ्याला शिक्षिकेनं चक्क छत्री फेकून मारलीय. यामध्ये त्य़ा विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालीय.

Jul 11, 2014, 12:05 AM IST

विद्यार्थ्यांनीच शिक्षिकेवर केला बलात्कार

राजस्थानमध्ये एक घृणास्पद घटना समोर आली आहे.

Apr 26, 2014, 03:53 PM IST

`व्हॉट्स अॅप`ची भाषा उत्तर पत्रिकेत

सध्याच्या तरुणाईला सोशल नेटवर्कींग साईट्सची इतकी सवय लागली आहे की, काही तरूणांनी चक्क व्हॉट्स अॅपची भाषा उत्तर पत्रिकेत उतरवली आहे.

Apr 24, 2014, 11:25 AM IST

विद्यार्थीनींवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा

चीनमध्ये एका प्राथमिक शाळेत शिक्षकानं जवळपास 11 विद्यार्थिनींवर बलात्कार आणि छेडखानी केल्याच्या आरोप होता. या शिक्षकाला प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. गाओ दाओशेंग (59) वरील गुन्हा सिद्ध झालाय. तो वुवेई काउंटी शाळेत शिक्षक आहे.

Apr 23, 2014, 11:02 PM IST

विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाबद्दल प्राचार्यासह शिक्षिकेला अटक

वलसाड जिल्ह्यातील सिल्धवा गावातील आश्रमशाळेत शिक्षिकेच्या मदतीनं एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. या प्रकरणात आश्रमशाळेच्या प्राचार्यासह एका शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांना कोर्टानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Dec 30, 2013, 05:49 PM IST

गट शिक्षण अधिकाऱ्यानंच केली शिक्षकाची हत्या?

बीड जिल्ह्यातल्या गेवराईतले शिक्षक राजेंद्र घाडगेच्या हत्येप्रकरणी गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेला अटक करण्यात आलीय. घाडगे यांची शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

Dec 29, 2013, 08:43 PM IST

शिक्षक आणि महिला शिक्षिकांचे रात्रभर ठिय्या आंदोलन

ठाणे जिल्हा परिषदेमधील ग्रामीण भागातील शिक्षकांच्या बदल्या चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याचं सांगून त्याविरोधात जिल्हापरिषद शिक्षक आणि सभादांनी आंदोलन केलंय. वारंवार मागणी करून सुध्दा त्याकडे शासन आणि जिल्हा अधिका-यांनी पाठ फिरवल्यानं त्याविरोधात शिक्षकांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलंय. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला शिक्षिकाही सामील होत्या.

Dec 8, 2013, 03:55 PM IST

तिच्या अचानक जाण्यानं कोल्हापूरकर हळहळले...

पुण्याहून परतताना कोल्हापूरच्या श्रुतिका चंदवाणी बरोबर अन्य तिघांचा अपघातात मृत्यू झाला. यातील श्रुतिका ही अव्वल दर्जाची स्केटिंगपट्टू होती. एवढंच नव्हे तर वयाच्या सहाव्या वर्षी श्रुतिका चंदवाणीनं ‘लिंबो स्केटिंग’मध्ये ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला होता. तिच्या जाण्यानं स्केटिंग मधला एक तारा निखळा असल्याचं तिच्या प्रशिक्षकांबरोबर अन्य कोल्हापूरकरांना वाटतंय.

Nov 10, 2013, 07:38 PM IST

शिक्षिकेचा घृणास्पद प्रकार, मूकबधिर विद्यार्थांकडून मॉलिश

मुकबधिर मुलं चेपतायत शिक्षिकेचे पाय

विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातंय अशैक्षणिक काम

विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातंय पायांना मालिश

विद्यार्थ्यानेच उघड केला हा प्रकार

Oct 27, 2013, 10:21 PM IST

शिक्षक-शिक्षिकांनाही `लुंगी डान्स`चा मोह आवरेना!

नेहमी शिक्षकांचा धाक, शिक्षकांची शिस्त असल्या गोष्टींची चर्चा होते. मात्र, अहमदनगरच्या शिक्षकांनी या सर्व आदर्शांना तिलांजली देत थेट रस्त्यात लुंगी डान्स करण्याचा पराक्रम केला

Sep 28, 2013, 04:32 PM IST

`आदर्श` शिक्षकाचा प्रताप, विद्यार्थीनीचा विनयभंग

अकोला जिल्ह्यातील शिर्ला गावात गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रयत्न एका नराधम शिक्षकाने केलाय. चंदू गोतरकर असं या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाला `आदर्श` पुरस्कार मिळाला आहे. त्याने विद्यार्थीनीचा विनयभंग केलाय.

Aug 10, 2013, 12:16 PM IST

शिक्षिकेवर बलात्काराप्रकरणी ४ शिक्षकांवर गुन्हा दाखल

उच्चशिक्षित महिला शिक्षिकेला नोकरी आणि लग्नाचं अमिष दाखवून लैंगिक शोषण आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली मालेगाव शहर पोलिसांनी चार शिक्षकांवर गुन्हा दाखल केलाय.

Jul 28, 2013, 11:25 PM IST