विद्यार्थ्यांना वाचविता कुत्र्याचा भर वर्गात शिक्षिकेवर हल्ला

 पिसाळलेल्या कुत्र्यानं भर वर्गात शिरुन शिक्षिकेवर जीवघेणा हल्ल्या केल्याची घटना नालासोपाराच्या श्रीमती इरावती देवी हिंदी हायस्कुल घडलीय. या घट्नेने विद्यार्थी आणि शिक्षिकेत घबराहट पसरली आहे. 

Updated: Jul 19, 2014, 01:24 PM IST
विद्यार्थ्यांना वाचविता कुत्र्याचा भर वर्गात शिक्षिकेवर हल्ला title=

नालासोपारा : पिसाळलेल्या कुत्र्यानं भर वर्गात शिरुन शिक्षिकेवर जीवघेणा हल्ल्या केल्याची घटना नालासोपाराच्या श्रीमती इरावती देवी हिंदी हायस्कुल घडलीय. या घट्नेने विद्यार्थी आणि शिक्षिकेत घबराहट पसरली आहे. 

जखमी शिक्षिकेस वसईतील महापालिकेच्या सर डी.एम.पे्टीट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे वसई विरार परिसरात दहशत पसरली आहे. याबाबत महापालिका मात्र चक्क मुग गिळून गप्प आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय. 

शिक्षिका  क्रीष्णा बावरिया या हायस्कुलमध्ये शिक्षिका आहेत. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास शाळा भरलेली असतांना पिसाळलेला कुत्रा वर्गात शिरला आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर हाल्ला करीत होता. तेवढ्यात बावरिया या शिक्षिकेने त्याला हाकालण्याचा प्रयत्न केला असता पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने चक्क शिक्षिकेच्या दोन्ही हातांना आणि डाव्या पायावर जोराचा चावा घेत. जीवघेणा हल्ला केला. वर्गातील मुलांनी आपला जीव मुठीत घेवून पळापळ आणि आरडाओरडा केली. तेवढ्यात तेथील स्थानिक नागरिकांनी कुत्र्याला पिटाळून लावले आणि शिक्षिकेचा प्राण वाचविला.

वसई आणि विरारमध्ये मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परंतु यावर महापालिका कोणतीच कारवाई करीत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.