जम्मू-काश्मीर । पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांना प्रशिक्षण
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे. काश्मीरमध्ये इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडीच असल्याचे पाकिस्तानने पुन्हा जगाला दाखवून दिले आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हल्ल्यानंतर उद्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग उद्या काश्मीरला जाणार आहे. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची देशाला ग्वाही दिली आहे. दरम्यान, पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कडक पाउले उचलावी आणि थेट कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केले आहे.
Feb 15, 2019, 12:15 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
जम्मूृृृ-काश्मीर इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 15, 2019, 12:10 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
जम्मूृृृ-काश्मीरत इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
Feb 15, 2019, 12:05 AM ISTकाश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे ४४ जवान शहीद
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 14, 2019, 10:43 PM ISTसर्जिकल ऑपरेशनसाठी रात्रीचीच वेळ का निवडतात, जाणून घ्या यामागील कारण?
भारताने सर्जिकल ऑपरेशन करुन उरी हल्ल्याचा योग्य बदला घेतला. यासाठी भारतीय लष्कराने रात्रीचीच वेळ निवडली होती.
Sep 30, 2016, 11:54 AM ISTभारतीय कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या दफनविधीसाठी पाकिस्तानची लफवाछपवी
भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून आता लफवाछपवी दिसून येत आहे. दहशतवाद्यांच्या दफनविधीसाठी ही लफवाछपवी दिसत आहे.
Sep 30, 2016, 11:06 AM ISTभारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमारेषेवर हालचाली
उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून धडक कारवाई केली. तरी पाकिस्तानची खुमखुमी गेलेली नाही. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमेवर हालचाली दिसत आहेत.
Sep 30, 2016, 09:32 AM ISTपीओकेतील भारताच्या हल्ल्याला उत्तर देऊ : पाकिस्तान
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडत पिओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाईकला पुढीलवेळी उत्तर देऊ असे उद्धट उत्तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिले आहे.
Sep 30, 2016, 09:12 AM ISTउरीतील शहीद जवानांच्या पत्नी, कुटुंबीयांकडून सर्जिकल स्टाईकबद्दल स्वागत
उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला आहे. मोठी लष्करी कार्यवाही करत 35 अतिरेक्यांना लष्कराने कंठस्नान घालते आहे. सर्जिकल स्टाईकबद्दल उरीतील शहीद जवानांच्या पत्नींकडून स्वागत करण्यात आले आहे.
Sep 30, 2016, 07:59 AM ISTउरी हल्ल्यानंतर भारताचा ‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली कडक भूमिका कायम राखत इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 28, 2016, 08:16 AM IST