water shortage

मंत्र्यांचे दौरे मराठवाड्याला पुरेसे?

दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय. अशातच आता राजकीय नेत्यांनी दुष्काळाचं राजकारणही जोरात सुरु केलंय. मात्र, दुष्काळग्रस्तांचे डोळे लागले आहे ते सरकारी मदतीकडे.

Feb 10, 2013, 06:45 PM IST

बुलढाण्याला पाणीपुरवठा करणारं धरण कोरडं

बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारं येळगाव धरण 100 टक्के कोरडं झाल्यानं डिसेंबर महिन्यातच शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागलीय. शहरात 20 ते 22 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे महिला वर्गावर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलीय.

Dec 26, 2012, 08:03 PM IST

मराठवाड्याच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा हल्लाबोल

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. हक्काच्या पाण्यासाठी शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणा केली.

Nov 5, 2012, 08:24 PM IST

अत्यल्प पाण्यात कॅलीफ्लॉवरचं पीक

दुष्काळात अनेक शेतक-यांचं नुकसान झालं असलं तरी काही शेतक-यांनी मात्र अत्यल्प पाण्यात चांगलं उत्पादन घेतलंय अशा शेतक-यांपैकी औरंगाबदच्या ज्ञानेश्व काकडे य़ांनी फुलकोबीचं उत्पादन घेऊन शेतक-यांपुढे आपला आदर्श ठवेलाय.

Sep 24, 2012, 09:25 AM IST

पाणीटंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्र पडणार बंद!

पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.

Jul 25, 2012, 09:43 AM IST

यवतमाळमध्ये भीषण पाणी टंचाई

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारात नियोजनाचा अभाव असल्यामुळे यवतमाळ शहरात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. यवतमाळकरांची तहान भागवण्यासाठी असलेला निळोणा प्रकल्प आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी चार-पाच दिवस वाट पाहावी लागतेय.

Jun 10, 2012, 11:58 AM IST

जळगावात पाणीटंचाई, बैठकीत खडाजंगी

राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीमुळं सरकारच्या तोंडचं पाणी पळालंय. जळगावात मात्र पाणीटंचाईबाबत अधिकारी सुस्त असल्याचं आढळून आलंय. याबाबत पाणीपुरवठा मंत्र्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत याचा प्रत्यय आला.

Apr 27, 2012, 04:49 PM IST