zee 24 taas

तलाठी भरती परीक्षेत गोंधळ का झाला? विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले...

Talathi Exam 2023: राज्यभरातील 115 टीसीएस केंद्रावर तलाठी भरती परीक्षा निश्चित केली होती.डाटा सेंटर सर्व्हरवर समस्या उद्भवली. त्यामुळे पहिल्या सत्रातील परीक्षा उशीरा सुरु झाल्या आहेत. तशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या असून तिन्ही सत्रांमध्ये बदल केले आहेत, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

Aug 21, 2023, 02:16 PM IST

तलाठी भरतीचे आधीच 1 हजार अर्ज शुल्क त्यात परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांची वेगळी लूट

सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा उशीराने सुरु झाल्या. आधीच दूरवरचे परीक्षा केंद्र आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्यात आता  परीक्षा केंद्रावर बॅग आणि मोबाईल ठेवण्यासाठी पैसे आकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

Aug 21, 2023, 11:28 AM IST

Talathi Bharti 2023: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा केंद्रावर गोंधळ

Server Down in Talathi Exam Centreराज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा सुरु आहे. दरम्यान अनेक केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यानं परीक्षा खोळंबल्या आहेत.

Aug 21, 2023, 09:49 AM IST

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेने घेतला 'हा' निर्णय

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गासाठी निघणाऱ्या पदयात्रेत मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Aug 20, 2023, 10:05 AM IST

Advance Blood Test: एका रक्त चाचणीत होणार 18 प्रकारची तपासणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट

Advance Blood Test: केवळ एका रक्त तपासणीद्वारे आता प्रकारचे जीन्स आणि संसर्गास कारणीभूत बॅक्टेरिया शोधले जाऊ शकतील. पर्यायाने डॉक्टरांकडून रुग्णावर तशाप्रकारे उपचार केले जाऊ शकतील.

Aug 20, 2023, 09:35 AM IST

आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांची वारसा नोंद होणार रद्द, 'या' ग्रामपंचायतीने घेतला निर्णय

Yarol GramPanchayat Decesion: आई वडिलांनाचा सांभाळ जर कोणी करत नसेल आणि अशी तक्रार आल्यास थेट त्याचा वारसा नोंद रद्द करण्यात येईल असा ऐतिहासीक निर्णय लातूर जिल्ह्यातील येरोळ ग्रामपंचायतीने घेतला आहे.

Aug 20, 2023, 08:38 AM IST

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले, नेमकी कारणे जाणून घ्या

Pune-Mumbai Expressway Accident: पुणे मुंबई महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले आहे. मागच्या सहा महिन्यांच्या आकडेवरीचा विचार केला तर अपघाताचे प्रमाण 20 टक्क्यांनी तर प्राणांतिक अपघाताचे प्रमाण 42 टक्क्यांनी घटले आहे.

Aug 20, 2023, 07:42 AM IST

Sunday Horoscope: आजच्या पंचांगानुसार कोणती वेळ शुभ आणि अशुभ? राहु काळही जाणून घ्या

आज 20 ऑगस्ट रोजी श्रावण शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी आणि दिवस रविवार आहे. नक्षत्र हस्त आणि करण वाणीज असेल. यासोबतच सिद्धीचे योगही असतील. आजचे पंचांग पंडित दिव्यांक शास्त्री यांच्याकडून जाणून घेऊया.

Aug 20, 2023, 07:01 AM IST

ट्रेनच्या तिकिटात 'या' रुग्णांना मिळते सवलत, आजारांची यादी पाहा

Train fare Discount:क्षयरोगाचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेले परिचर यांना द्वितीय, स्लीपर आणि फर्स्ट क्लासमध्ये 75 टक्के सवलत मिळते. अटेंडंटलाही तितकीच सवलत दिली जाते. 

Aug 19, 2023, 02:22 PM IST

ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी लोकं पाळलीयत- राज ठाकरे

Raj thackeray On Trollers: सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही. सत्ता जेव्हा हातात येते तेव्हा ती जायला सुरुवात झालेली असते. ती किती काळ टिकवायची हे तुमच्या हातात असते, असे ते यावेळी म्हणा

Aug 19, 2023, 01:31 PM IST

'मुख्य'चे 'उप' झाल्याने देवेंद्र फडणवीस अस्वस्थ, सामनातून फडणवीसांवर जोरदार टीका

Devendra Fadnvis: सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्य़ात आलीय. फडणवीसांना उप झाल्याचा वैफल्य आलंय. त्यांना न्यूनगंडाने अस्वस्थ केलंय अशी टीका फडणवीस यांच्यावर करण्यात आलीय. सामनाच्या अग्रलेखातून काय टीका करण्यात आलीय पाहूया. तसेच फडणवीसांना 'सांभाळा' असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. 

Aug 19, 2023, 11:42 AM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या आजचे दर

Gold and Silver Prices:  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54 हजार 250 रुपये इतकी आहे. या आधीच्या दिवशीदेखील ही किंमत 54 हजार 250 रुपये इतकी होती. त्यामुळे या किंमती स्थिर असून यात कोणतीही वाढ झालेली नाही. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 59 हजार 170 रुपये आहे. हे दरही स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Aug 19, 2023, 10:42 AM IST

नवाब मलिकांविरोधातील तक्रार मागे? मोहित कंबोज यांनी स्पष्टच सांगितले...

Big Relief to Nawab Malik: नवाब मलिक यांच्याविरोधात कंबोज यांनी दाखल केलेली तक्रार मागे घेतल्याचे वृत्त समोर आले पण यावर मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय आहे हे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Aug 19, 2023, 10:10 AM IST

व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवता येणार एचडी फोटो, तुम्हाला नवे अपडेट आले का?

WhatsApp HD photos Update: तुमच्याकडे कमी बँडविड्थ कनेक्टिव्हिटी असताना तुम्हाला फोटो पाठवायचा असेल तर तुम्ही कोणता फोटो कोणत्या व्हर्जनमध्ये ठेवू इच्छिता ते निवडू शकता. एचडी फोटो अपडेट येत्या काही आठवड्यांत जागतिक स्तरावर उपलब्ध होईल. तसंच हे फोटोही एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील. यूजर्स एचडी (2000x3000 पिक्सेल किंवा 1365x2048 पिक्सेल) क्वॉलिटीत फोटो पाठवू शकतात.

Aug 18, 2023, 07:00 PM IST

घरात लहान मुलांचे फोटो लावण्याआधी वाचा वास्तूचे 'हे' नियम

Vastu Rules for Kids Photos:तुमच्या घराची पश्चिम दिशा मुलांशी आणि सर्जनशीलतेशी संबंधित आहे. या दिशेला मुलांचे चित्र लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे मुले अभ्यासात हुशार होतात आणि आयुष्यात नेहमी पुढे जातात. जर तुम्हाला एकच मुलगा असेल तर तुम्ही त्याचा फोटो दक्षिणेच्या भिंतीवर लावू शकता. असे केल्याने, तुमचा मुलगा लवकरच जबाबदार बनतो आणि संपूर्ण कुटुंबाची एकहाती काळजी घेण्याचे धैर्य त्याला प्राप्त होते. 

Aug 18, 2023, 06:20 PM IST