zee 24 taas

IAS ची नोकरी सोडली; एका निर्णयाने बदलंल आयुष्य; आज संभाळतायत 2.60 लाख कोटींची कंपनी

RC Bhargava Success Story: मारुतीला खूप उंचीवर नेण्याचे श्रेय आर. सी. भार्गव यांना जाते. विशेष म्हणजे मारुती कंपनीला पुढे नेण्यासाठी आर. सी. भार्गव यांनी आयएएसची नोकरीही सोडली होती

Aug 31, 2023, 02:50 PM IST

'पीटी टीचरने आम्हाला बॅड टच..' पुण्यात अवघ्या 10 वर्षाच्या विद्यार्थीनींनी केली शिक्षकाची पोलखोल

Pune PT teachers Bad Touch: पुण्यातील लोहगाव परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयात शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीटी शिकवणाऱ्या शिक्षकानेच शाळेतील दोन विद्यार्थीनींचा विनयभंग केला. 

Aug 31, 2023, 10:37 AM IST
24 Taas Superfast  Check breaking news important events in Maharashtra in one click... PT14M57S

'24 Taas' Superfast | देशभरातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

24 Taas Superfast Check breaking news important events in Maharashtra in one click...

Aug 31, 2023, 09:55 AM IST

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये बंपर भरती, मुंबईत नोकरीसह 55 हजारपर्यंत पगार; ही संधी सोडू नका

BEL Mumbai Job: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनीअरच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यात प्रोजेक्ट इंजिनीअर मॅकेनिकलच्या-1 च्या 17, प्रोजेक्ट इंजिनीअर इलेक्ट्रिकल-1 च्या 4, प्रोजेक्ट ऑफिसर-1 ची 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. 

Aug 31, 2023, 09:32 AM IST

मुंबईचा आर्थिक कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टर प्लॅन, काय आहे? जाणून घ्या

Mumbai Master Plan: देशातील एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक म्हणजे 13 टक्के योगदान आहे. हे योगदान वाढून विकास दर देखील अधिक चांगला होण्यासाठी अशी सर्वसमावेशक योजना उपयोगी ठरेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

Aug 29, 2023, 05:31 PM IST

वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास करारात 'या' आहेत त्रुटी

Worli BDD chalis: वरळी बीडीडी चाळींचा  पुनर्विकास (वरळी,नायगाव,डिलाई रोड सध्या सुरू आहे. मात्र हा पुनर्विकास होत असताना केलेल्या करारामध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी सरकार आणि प्रशासनाकडे मांडूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही ,त्यामुळे बीडीडी चाळवासीय जांबोरी मैदान ते मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान असे जनआक्रोश आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमी जांबोरी मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय.

Aug 29, 2023, 04:58 PM IST

मुंबईच्या वडापावला टक्कर द्यायला आलाय गुलाबजाम पाव

Gulab Jam Pav: हे स्वीट सॅंडविच वडापावप्रमाणेच दिसते. स्वीट सॅंडविच बनायला अवघे 2 मिनिटे लागतात. त्यामुळे भुकेलेल्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. साधारण 10 रुपयांना स्वीट सॅंडविच मिळते. एका स्टॉलवर 100 ते 150 प्लेट संपतात. 

Aug 29, 2023, 03:48 PM IST

मी मुख्यमंत्री झालो तर...संतोष बांगरांनी पोलिसांना आधीच दिले 'हे' आश्वासन

Santosh Bangar: संतोष बांगर यांनी श्रावण मासानिमित्त कळमनुरी येथून कावड यात्रा काढली होती. येथे त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या यात्रेदरम्यान संतोष बांगर यांनी एक विधान केले. यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागली आहे. 

Aug 29, 2023, 02:20 PM IST

इंस्टावर भाईगिरीच्या रिल्स लाईक करताय? पोलिसांची तुमच्यावरही आहे नजर

Nashik Crime: सोशल मीडियात गुन्हेगारीचा व्हिडीओ शेअर केला जातो. त्यानंतर गुन्हेगार इंस्टावर लाईव्ह येतात. यातून पुढे आणखी गुन्हे घडतात. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
भाईगिरी आणि गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या रिल्स बनवणे आता महागात पडणार आहे. 

Aug 29, 2023, 01:41 PM IST

तुम्ही 'असे' पनीर तर खात नाही ना? कर्नाटकातून आलेले 4 हजार किलो बनावट पनीर जप्त

Pune Fake Paneer Seized: तुम्ही घरी खाण्यासाठी जे पनीर मागवता ते कुठून आणता? ते पनीर खाण्यायोग्य असेल का? याचा कधी विचार केलाय का? कारण पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक दोन किलो नव्हे ते तब्बल 4 हजार किलो पनीर जप्त करण्यात आले आहे.

Aug 29, 2023, 12:51 PM IST

'दान द्या' म्हणत घरात घुसले, सासू सुनेला बेशुद्ध केले आणि..नागपुरात दिवसाढवळ्या धक्कादायक प्रकार

Nagpur Crime: घटनेनंतर अवघ्या बारा तासात तिघांना अटक करण्यात यशोधरानगर पोलिसांना यश आलं. सागर याज्ञेकर, जितेंद्र याज्ञेकर, राजू गुजर, असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. 

Aug 29, 2023, 12:15 PM IST

धाराशिवच्या प्रेम शिंदेची आत्महत्या की हत्या? दीड हजार वाखरवाडी ग्रामस्थांनी केली 'ही' मागणी

Prem Shinde Suspicious Death: प्रेम शिंदेच्या शरिरावर मारहाणीचे काळे निळे व्रण आढळले आहेत. त्यामुळे हत्या की आत्महत्या? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.

Aug 29, 2023, 11:01 AM IST

भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवेळी 'प्राणीप्रेमीं'चा अडथळा, पुणे पालिकेने घेतला 'हा' निर्णय

Pune Street Dogs: श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्रक्रिया आणि लसीकरण करण्याच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पुणे महानगर पालिकेने जाहीर केले आहे.

Aug 29, 2023, 10:09 AM IST

केंद्रीय पेट्रोकेमिकल्स संस्थेत बंपर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

CIPET Recruitment 2023: सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणजेच ट्रेनी पदाच्या 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Aug 29, 2023, 09:35 AM IST