एलफिन्स्टन चेंगराचेंगरी

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळेच 'हे' तीन प्रश्न मार्गी, उद्धव ठाकरेंचा दावा

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मनसेने मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. तसेच रेल्वे स्थानकांवर असलेल्या फेरीवाल्यांना १५ दिवसांत हटविण्याचं अल्टिमेटमही मनसेनं दिलं.

Oct 7, 2017, 05:35 PM IST

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीचं पोलिसांनी सांगितलं कारण

पोलिसांनी चौकशी दरम्यान, स्टेशन मास्तरांकडून त्या दिवशीची रेल्वेची माहिती आणि एलफिन्स्टन-परळ स्टेशनवर किती प्रवासी उतरले याची माहिती घेतली. 

Oct 7, 2017, 04:17 PM IST

चेंगराचेंगरीची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करावी, न्यायालयात याचिका

एलफिन्स्टन स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. त्यावर पश्चिम रेल्वे आणि एनआयए यांनी आपलं म्हणणं मांडावं असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. 

Oct 5, 2017, 05:45 PM IST

मुंबईच्या गर्दीततच आहे मुंबईचा मारेकरी!

शहर-मुंबई. स्थळ-एलफिस्टन स्टेशन. ती बातमी आली आणि मन सर्द झालं. अफवा पसरते काय आणि काही मिनिटांत २०-२३ जणांचे बळी जातात काय. कारण काय तर म्हणे चेंगराचेंगरी. खरं म्हणजे या स्टेशनशी माझा रोजचा परिचय. दादर स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे स्टेशन. माझ्या करी रोडच्या ऑफिसच्या २०व्या मजल्यावरून हे स्टेशन स्पष्ट दिसते. आपल्या परिचयाच्या ठिकाणावर असं अघटीत काही घडावं हे मनाला पार उदध्वस्त करून टाकणारं. अनेकांच्या स्वप्नांना आकार देणारी हीच मुंबई अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारी ठरत आहे. 

Oct 2, 2017, 04:42 PM IST

मनसेची जनआंदोलनाची हाक, मोर्चेबांधणी सुरु

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट रेल्वे स्टेशनवर घोषित केलेल्या मोर्चासाठी पक्षांने मोर्चेबांधणी सुरु केलीय. 

Oct 1, 2017, 10:55 PM IST

चेंगराचेंगरी दुर्घटना : सहा महिन्यांपूर्वीच ती सीए झाली होती

एलफिन्स्टन-परळला जोडणाऱ्या ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हरपला. मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या हिलोनी देढिया हिचा या दुर्घटनेत करुण अंत झाला. सहा महिन्यांपूर्वीच हिलोनी सीए झाली होती. तिचा हा आनंद सहा महिनेही टिकला नाही. 

Sep 30, 2017, 07:29 PM IST

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मुंब्र्यातील दोन तरुण ठार

मुंबईतल्या परेल-एल्फिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मुंब्रा येथील दोन जण मृत्यूमुखी पडले. शकील राशिद शेख (30) आणि ज्योति चव्हाण (28) अशी या घटनेत मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. 

Sep 30, 2017, 06:29 PM IST