मनसेची जनआंदोलनाची हाक, मोर्चेबांधणी सुरु

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट रेल्वे स्टेशनवर घोषित केलेल्या मोर्चासाठी पक्षांने मोर्चेबांधणी सुरु केलीय. 

Updated: Oct 1, 2017, 10:55 PM IST
मनसेची जनआंदोलनाची हाक, मोर्चेबांधणी सुरु title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट रेल्वे स्टेशनवर घोषित केलेल्या मोर्चासाठी पक्षांने मोर्चेबांधणी सुरु केलीय. 

पश्चिम रेल्वेच्या एल्फिस्टन रोड स्टेशन पुलावर झालेल्या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी ५ तारखेला ह्या जन आंदोलनाची हाक देण्यात आलीय. स्वतः राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे पक्षांन मुंबई-ठाणे-पुणे-नाशिक या सर्व शहरातून मोर्चाला ताकद लावण्याचा निर्णय घेतलाय. 

मोर्चाची व्यूहरचना ठरवण्यासाठी रविवारी संध्याकाळी पक्षाचं मुंबईतील मुख्य कार्यालय राजगड येथे पदाधिकाऱयांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महत्वाच्या सूचना पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱयांना दिल्या.