गुलाब गँग

`क्वीन`चा `गुलाब गँग`ला दे धक्का

माधुरी दीक्षित आणि जुही चावला सारख्या बड्या अभिनेत्रींनी साकारलेल्या `गुलाब गँग`ला कंगना राणावतच्या `क्वीन`ने मागे टाकलं आहे.

Mar 12, 2014, 09:18 AM IST

‘गुलाब गँग’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांच्या ‘गुलाब गँग’ सिनेमावरील बालंट टळले आहे. त्यामुळे हा चित्रपट आजपासून देशात प्रदर्शित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमावरील बंदी उठवली आहे.

Mar 7, 2014, 08:47 AM IST

`गुलाब गँग`च्या प्रदर्शनाला स्थगिती

दिल्ली उच्च न्यायालयानं आगमी हिंदी सिनेमा `गुलाब गँग`च्या प्रदर्शन बुधवारी स्थगित करण्याचे आदेश दिलेत. हा सिनेमा कथित स्वरुपात उत्तरप्रदेशातील सामाजिक कार्यकर्त्या संपत पाल यांच्या जीवनावर आधारित आहे.

Mar 5, 2014, 11:13 PM IST

`गुलाब गँग`मुळे माधुरी, जुहीच्या अभिनयात तुलना

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला गुलाब गँग चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकाच चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहेत. म्हणून जुही आणि माधुरी यांच्या अभिनयाची तुलनाही सुरू झाली आहे.

Jan 19, 2014, 11:54 PM IST

माधुरी सोबत नव्हतं करायचं काम- जुही चावला

अभिनेत्री जुही चावला जी पहिल्यांदाच माधुरी दीक्षित सोबत ‘गुलाब गँग’ चित्रपटात झळकणार आहे. ती म्हणते, की पहिले तिला माधुरी दीक्षितसोबत करायचं नव्हतं आणि भविष्यातही करेल असं वाटत नाही. माधुरी दीक्षित आणि जुही चावला या नव्वदच्या दशकातल्या स्पर्धक अशा अभिनेत्री आहेत आणि त्यांनी कधीही एकत्र चित्रपटात काम केलं नव्हतं.

Jan 15, 2014, 08:49 AM IST

माधुरीच्या <b><font color=red>`गुलाब गँग`</font></b>चा ट्रेलर आला रे आला....

गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेला माधुरी दीक्षितचा गुलाब गँग याच चित्रपटाचा प्रोमो प्रसिद्ध झाला आहे. प्रमुख भूमिकेत माधुरी दीक्षित असून जुही चावला आणि माधुरीने प्रथमच काम केले आहे.

Jan 10, 2014, 11:16 AM IST

माधुरी दीक्षितचा डबल धमाका

बहुचर्चित आणि अनेकांना उत्कंठा लावणारा `डेढ इश्किया` या माधुरीचा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटासोबत तिच्या `गुलाब गँग` चित्रपटाचा प्रोमोही दाखवण्यात येणार आहे.

Jan 7, 2014, 02:21 PM IST

‘गुलाब गँग’मध्ये माधुरी करणार ढुशूम-ढुशूम!

माधुरी दीक्षित ‘गुलाब गँग’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमातून माधुरीचा हटके लूक पहायला मिळणार आहे.

Sep 26, 2013, 09:30 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x