शिवसेनेला खूश करण्यासाठी भाजपचा प्रयत्न, समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव?
शिवसेनेला खूश करण्यासाठी भाजपने हरतऱ्हेने प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.
Jan 11, 2019, 06:37 PM ISTबाळासाहेबांना धडा शिकवायचा होता हाफीजला : हेडली
बाळासाहेबांना धडा शिकवायचा आहे, असे मला हाफीज सईदेने सांगितलं होते. काम पूर्ण करायला ६ महिने लागतील असे मी हाफीजला सांगितलं होते. तसेच सीबीआय मुख्यालय तन्ना हाऊस, महाराष्ट्र विधानभवनची रेकी केली होती. मात्र, इस्त्राईल दुतावासाची रेकी केली नव्हती, अशी कबुली २६/११ हल्ल्यातील माफिचा साक्षीदार अतिरेकी डेव्हिड हेडली यांनी दिली.
Mar 26, 2016, 11:11 AM IST'बाळासाहेब 'हिट लिस्ट'वर होते याचा अभिमान'
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बाळासाहेब हिट लिस्टवर होते, यावर अनोखी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, 'लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनेच्या 'हिट लिस्ट‘वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, हे ऐकून आम्हाला अभिमान वाटतो.'
Mar 24, 2016, 08:46 PM ISTबाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लष्कर ए तोयबाचे होते टार्गेट : हेडली
बाळासाहेब ठाकरे हे लष्कर ए तोयबाच्या हिट लिस्टवर होते, असा गौप्यस्फोट हेडली यांने आज केलाय.
Feb 12, 2016, 11:39 AM ISTराजीव गांधी जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या : आरोग्यमंत्री
राजीव गांधी जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या, अशी मागणी शिवसेनेचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. दरम्यान, या योजनेच्या नामांतराला काँग्रेसने विरोध केलाय.
Aug 6, 2015, 07:12 PM ISTबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित?
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याजवळील जागा निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाळासाहेब यांच्या स्मारकासाठी नेमलेल्या समितीने शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याजवळची जागा निश्चित केली आहे. या समितीचा अहवाल राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे सादर करण्यात आला. याबाबत मुख्य सचिवांनी दुजोरा दिलाय.
Jun 6, 2015, 09:41 AM IST`फेसबुकवर पोस्ट करणार नाही, दोघी घाबरल्या`
सोशल नेटवर्किंग साइटवर आता यापुढे पोस्ट करणार नाही, असे सांगून जी फेसबुकवर पोस्ट टाकली त्याबद्दल मी माफी मागत असल्याचे तिने सांगितले. या घटनेनंतर या दोघी खूप घाबरल्याचे पत्रकारांना माहिती देताना दिसून आले.
Nov 20, 2012, 02:40 PM ISTसातासमुद्रपार बाळासाहेब...
बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता. बाळासाहेबांच्या निधनाची देशभरातील नाही तर जगभरातील मीडियाने दखल घेतली. श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, अमेरिका या देशातील प्रसारमाध्यमांनी बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केले.
Nov 19, 2012, 06:33 PM ISTबाळासाहेबांच्या अस्थीचे मिळणार सैनिकांना दर्शन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थीकलश राज्यातील जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. याची जबाबदारी संपर्क नेत्यांवर असणार आहे. गावागावांतील शिवसैनिकांना दर्शन घेता यावं यासाठी अस्थीकलश ठेवला जाणार आहे. २३ नोव्हेंबरला अस्थीकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे.
Nov 19, 2012, 04:26 PM ISTबाळासाहेबांचे स्मारक हवे शिवाजी पार्कमध्ये - जोशी
शिवाजी पार्कात बाळासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी शिवसैनिकांकडून इच्छा आहे.
Nov 19, 2012, 02:03 PM ISTबाळासाहेबांची पाकिस्तानमध्ये दखल
बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणाची दखल घेणा-या पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी त्यांच्या निधनाच्या बातमीलाही ठळक प्रसिध्दी दिली आहे. भारतातील लोकप्रिय नेतृत्व, कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचे संस्थापक असा उल्लेख बाळ ठाकरे यांच्याबाबत पाकिस्तानी वृत्तपत्रांनी केला आहे.
Nov 18, 2012, 01:05 AM ISTठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक - बीबीसी
महाराष्ट्र राजकारणात दशकापासून बाळ ठाकरे यांचा दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता, असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
Nov 18, 2012, 12:40 AM ISTबाळासाहेबांची प्रकृती सुधारतेय - बाबासाहेब पुरंदरे
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनीही मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी आई जगदंबेकडे प्रार्थना केली. जगदंबे तुझाच उदय होवू दे, तुझाच उदय होवू दे. आदरणीय बाळासाहेबांची प्रकृती सुधारतेय. तुम्हा आम्हांच्या या तळमळीचा आपल्याला मिळालेला हा परमेश्वरी प्रतिसाद आहे, हे भेटीनंतर शिवशाहीर यांनी सांगितले.
Nov 15, 2012, 09:12 PM ISTबाळासाहेबांची प्रकृती सुधारत आहे – सुभाष देसाई
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील शिवसैनिकांचे देवाला साकडे घातलं आहेत. त्यांच्या प्रार्थनेमुळे बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असी माहिती शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी आज मीडियाला दिली.
Nov 15, 2012, 04:06 PM ISTबाळासाहेबांसाठी `मनसे` प्रार्थना
बाळासाहेब यांच्या स्वास्थ्यासाठी शिवसेना नेते आणि शिवसैना कार्यकर्ते देवाला साकडे घालीत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही यात मागे राहिलेली नाही. मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी मनाने शिवसैनिक असलेल्या जुन्या सहका-यांना घेऊन राज्यातील काही देवस्थानांना भेटी दिल्या. यावेळी बाळासाहेबांची प्रकृती बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली.
Nov 8, 2012, 11:59 AM IST