रॉयल अजिंक्य

रॉयल 'अजिंक्य', बंगळुरु गारद

आयपीएलच्या पाचव्या मोसमातील हिरो ठरला आहे तो, राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर अजिंक्य रहाणे. त्यांने वादळी खेळी करताना नाबाद १०३ रन्स केवळ ६० बॉलमध्ये फटकावल्या. यात १२ फोर आणि ५ सिक्स लगावले. अजिंक्यच्या शतकामुळे १९५ची मजल राजस्थान रॉयल्सने मारली. मात्र, डॅनियल व्हिटोरीचा बंगळुरु संघ गारद झाला. बंगळुरुला १३६ रन्स करता आल्या.

Apr 16, 2012, 08:46 AM IST