पार्किंगमध्ये स्कूटर शोधणं सोपं होणार; स्टायलिश लूक, दमदार फिचर्स! Yamaha अपडेटसह लाँच करतीये RayZR; पण किंमत किती?

2024 Yamaha RayZR: यामाहाने आपल्या स्कूटरमध्ये काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. ज्यामध्ये नव्या फिचर्ससह नव्या रंगांचाही पर्याय आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 24, 2024, 01:34 PM IST
पार्किंगमध्ये स्कूटर शोधणं सोपं होणार; स्टायलिश लूक, दमदार फिचर्स! Yamaha अपडेटसह लाँच करतीये RayZR; पण किंमत किती? title=

2024 Yamaha RayZR: जापानमधील प्रमुख वाहन निर्माता कंपनी यामाहाने भारतीय बाजारपेठेत आपली RayZR ला काही अपडेटसह लाँच केलं आहे. यामाहाने आपल्या या स्टायलिश स्कूटरला 'आन्सर बॅक' फंक्शन आणि LED डेटाइम रनिंग लाइट (DRL) सारखे अपडेट्स दिले आहेत. या स्कुटरची किंमत 98 हजार 130 हजारांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते. ही स्कूटर आइस फ्लुओ-वर्मिलियन (केबल ब्ल्यू स्क्वायर) आणि मॅट ब्लॅकसह एका नव्या सायबर ग्रीन रंगात उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये नेमकं काय खास आहे हे जाणून घ्या. 

नव्या Yamaha RayZR मध्ये खास काय?

RayZR Street Rally चं आन्सर बॅक फंक्शन चालकाला गर्दीच्या ठिकाणी स्कूटर नेमकी कुठे आहे याची माहिती देतं. मोबाईल अॅपच्या माध्यमातून चालक बटण दाबून स्कूटर पार्क केलेल्या ठिकाणाची माहिती मिळवू शकतो. हे फंक्शन वापरल्यास स्कूटरमध्ये ब्लिंकरसह बीप साऊंड येतो. हे फिचर त्यांच्यासाठी फायदेशीर आह जे नेहमी गर्दीच्या ठिकाणी आपली दुचाकी पार्क करतात. अशा ठिकाणी अनेकदा दुचाकी कुठे आहे हे विसरायला होतं. 

रंग आणि डिझाईन

यामाहाची ही स्कूटर आता नव्या सायबर ग्रीन रंगात उपलब्ध आहे. यासह आइस फ्लूओ-वर्मिलियन आणि मॅट ब्लॅकसारख्या रंगातही खरेदी करु शकता. ड्युअल टोन सीट डिझाईन आणि रिफ्रेश्ड स्टायलिंग या स्कूटरला स्पोर्टी आणि आकर्षक लूक देतात. 

पॉवर आणि परफॉर्मन्स

या स्कूटरमध्ये 125 सीसी क्षमतेचा एअर कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे, जे 6500 आरपीएमवर 8.2 bhp ची पॉवर आणि 10.3 Nm चा टॉर्क जनरेट करते. हायब्रीड पॉवर असिस्ट आणि स्मार्ट मोटर जनरेटरचं (SMG) कॉम्बिनेशन स्कूटरचा परफॉर्मन्स आणखी चांगला करते. तसंच यामुळे जास्त आवाजही होत नाही. 

फिचर्स काय आहेत?

RayZR Street Rally मध्ये 21 लीटरचा स्टोरेज स्पेस देण्यात आला आहे, जो रायडर्सला आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी भऱपूर जागा देतं. याशिवाय यामध्ये टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि साईड स्टँड इंजिन कट-ऑफ सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. जी आरामदायी आणि सुरक्षित प्रवास देतं. यामद्ये ऑटोमॅटिक स्टॉप अँड स्टार्ट सिस्टीम आणि वाई-कनेक्ट बिटी कनेक्विव्हिटी सह डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरही देण्यात आलं आहे.