Work From Home करताना तुमचा Wifi स्लो झालाय? मग हे उपाय नक्की करुन पाहा

आपण जेव्हा ऑफिसमध्ये असतो, तेव्हा तुमच्या इंटरनेटला वेग हा त्याच्या चांगल्या रेंजच्या राउटरमुळे येतो.

Updated: Jul 9, 2021, 09:09 PM IST
Work From Home  करताना तुमचा Wifi स्लो झालाय? मग हे उपाय नक्की करुन पाहा title=

मुंबई : कोरोनाव्हायरसमुळे देशातील अनेक ऑफिसे सध्या बंद आहेत. ज्यामुळे बरेच कर्मचारी घरून काम करत आहेत. परंतु घरातुन काम करण्यासाठी एक गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे इंटरनेट. जर इंटरनेच चालले नाही, तर तुम्ही तुमचे काम करु शकणार नाही. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करताना इंटरनेट महत्वाचे आहे. परंतु नुसतेच इंटरनेट असून चालणार नाही, तर तो इंटरनेट चांगला देखील चालला पाहिजे, तरच तुमचे काम जलद गतीने पूर्ण होऊ शकते.

आपण जेव्हा ऑफिसमध्ये असतो, तेव्हा तुमच्या इंटरनेटला वेग हा त्याच्या चांगल्या रेंजच्या राउटरमुळे येतो. तसेच बऱ्याच ऑफिसेसमध्ये IT टिम असते, जी हे सगळं मॅनेज करत असते. परंतु घरी मात्र येणाऱ्या त्रुटींना आपल्यालाच सोटवावे लागेल. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वायफायची गती वाढवू शकता.

वाय-फायचा वेग वाढवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त काही सोप्या गोष्टींचा अवलंब करा आणि तुमचं काम झालंच म्हणून समजा.

1. राउटरचा वेग वाढविण्याचा एक सर्वात सोपा आणि सगळ मार्ग म्हणजे, जेव्हा वेग कमी होतो तेव्हा राउटर बंद करुन चालू करा. याशिवाय वाय-फायचा वेग कमी असल्यास तुम्ही त्याच्या मॉडेमला देखील चालू किंवा बंद करु शकता.

2. राउटर अशा ठिकाणी ठेवा की, जिथे त्याला संपूर्ण नेटवर्क मिळेल. जर राउटरच्या समोर एखादी मोठी वस्तू आली, तर ती सिग्नलवर परिणाम करु शकते. त्यामुळे तुम्ही राउटरची जागा बदलून किंवा त्याचा अॅन्टीना हलवून नेटवर्क मिळवू शकता. ज्यामुळे तुमचे इंटरनेट फास्ट चालेल.

3. बर्‍याच राउटर खराब होऊ शकतात किंवा त्यात काही बिघाड असण्याची शक्यता असू शकते. ज्याचा थेट परिणाम तुमच्या इंटरनेटच्या वेगावर होतो. आपण बराच काळ राउटर वापरत असल्यामुळे त्यात बर्‍याच समस्या येऊ शकतात. त्यामुळे तुमचा राउटर वेळेत बदला.

4. वेळोवेळी राउटर अपडेट करत रहा. बऱ्याचदा काही राउटर असे असतात की, त्याला मोबाईलप्रमाणे अपडेट करण्याची गरज असते. ज्यामुळे त्यांचा वेग कमी होतो. अशा परिस्थितीत तुमचा राउटर तपासा आणि त्याला अपडेट करण्याची गरज असल्यास तो अपडेट करा.